Rikshaw Strike: बदलापूरमधील रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारला, चाकरमान्यांचे हाल

स्थानिक रिक्षा चालकांनी पूर्व आणि पश्चिम इथं रिक्षा वाहतूक संध्याकाळी ४ वाजेनंतर बंद केली.
Badlapur
Badlapur Saam TV

बदलापूर : होम प्लॅटफॉर्मचे कारण देत बदलापूर (Badlapur) पश्चिम इथलं रिक्षा स्टँडवर तोडकामाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त बदलापूर शहरातील सर्व रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारला. पर्यायी जागा देण्याआधीच रिक्षा स्टँड तोडल्यानं रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. मात्र यामुळे बदलापुरातील चाकरमान्यांचे घरी जाताना हाल होत आहेत.

स्थानिक रिक्षा चालकांनी पूर्व आणि पश्चिम इथं रिक्षा वाहतूक संध्याकाळी ४ वाजेनंतर बंद केली. त्याचप्रमाणे पालिकेने पाठवलेल्या नोटीसवर आवक क्रमांक आणि कारवाईची तारीख नमूद केलेली नाही, असं मनसे विभागाध्यक्ष किरण भगत यांनी सांगितलं आहे.  (Maharashtra News)

Badlapur
Ranjit Savarkar : एका बाईसाठी पंडित नेहरू यांनी देशाची फाळणी मान्य केली; रणजित सावरकरांचं वादग्रस्त विधान

मुख्य बाजारपेठेतील गाळ्यांवरही कारवाई

बदलापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफॉर्मला लागून तब्बल ३५ दुमजली गाळे अनधिकृतरित्या उभारण्यात आले होते. हे गाळे बदलापूर नगरपालिकेने जमीनदोस्त केले. रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफॉर्मला लागूनच मागील २ ते ३ महिन्यात अनधिकृत पद्धतीने तब्बल ३५ दुमजली गाळे उभारण्यात आले होते.

Badlapur
Ration News : रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; सरकारने केले नवे नियम

गाळ्यांची ही जागा रेल्वेची असून ती रेल्वेने होम प्लॅटफॉर्मसाठी ताब्यात घेतली होती. मात्र त्यातली काही जागा आवश्यक नसल्याने रेल्वेने ती सोडून दिली. त्यामुळे या जागेवर बदलापूर शहरातील व्यापाऱ्यांनी अनधिकृतरित्या ३५ दुमजली गाळे पालिकेची कोणतीही परवानगी न घेता उभारले होते. भर बाजारपेठेत झालेलं हे बांधकाम पाहून बदलापूर शहरात याची मोठी चर्चा सुरू झाली होती. पालिकेने या बांधकामांना नोटीस बजावल्यानं गाळेधारक न्यायालयात गेले होते. मात्र न्यायालयाने सुद्धा त्यांना दिलासा न दिल्यामुळे अखेर आज बदलापूर पालिकेने हे गाळे जमीनदोस्त केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com