रिंग रोड, हायस्पिड रेल्वेचे श्रेय घेणाऱ्यांना मोहितेपाटलांचा घरचा आहेर...

इतकेच नव्हे तर मोहितेपाटलांनी शिवसेनेचे माजी खासदार आढळरावपाटलांसह सहकारी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना ही जाब विचारला आहे.
रिंग रोड, हायस्पिड रेल्वेचे श्रेय घेणाऱ्यांना मोहितेपाटलांचा घरचा आहेर...
रिंग रोड, हायस्पिड रेल्वेचे श्रेय घेणाऱ्यांना मोहितेपाटलांचा घरचा आहेर...Saam Tv

पुणे - पुणे Pune रिंग रोड आणि पुणे नाशिक हायस्पिड रेल्वे Nashik Highspeed Railway जमिन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP आमदार दिलीप मोहिते पाटील Dilip Mohite Patil देखील आक्रमक भुमिकेत दिसून आले. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा विरोध केला आहे. इतकेच नव्हे तर  मोहितेपाटलांनी शिवसेनेचे माजी खासदार आढळरावपाटलांसह सहकारी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना ही जाब विचारला आहे.

हे देखील पहा -

पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचे श्रेय घ्यायला येता मग शेतकऱ्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष का करता. आम्हाला रेल्वेचा नेमका काय फायदा होणार ? असा सवाल उपस्थीत करत पुणे रिंग रोड आणि पुणे नाशिक हायस्पिड रेल्वेचा विरोध असल्याचे दाखवुन दिले आहे.

रिंग रोड, हायस्पिड रेल्वेचे श्रेय घेणाऱ्यांना मोहितेपाटलांचा घरचा आहेर...
दोन्‍ही मुलांनी मिळून केला जन्‍मदात्‍याचा खून; दवाखान्‍यात जाण्याचे किरकोळ कारण

राज्य सरकारकडून दडपडशाही केली जात असुन शेतकरी लोकशाही मार्गाने विरोध करत आहे. मात्र आता राज्यसरकारने शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करावा यासाठी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आमदारांना निवेदन दिले आहेत. शेतकऱ्यांची बाजु राज्य सरकारकडे मांडण्यासाठी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहितेंना निवेदन दिले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांच्यासह शेतकरी, महिला शेतकरी उपस्थित होते.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com