Rohit Pawar : आता हा प्रश्न मनसेच्या कार्यकर्त्यांना पडू लागला आहे : राेहित पवार

राज ठाकरेंनी लाेकांच्या प्रश्नांवर बाेलले पाहिजे असेही आमदार पवार यांनी नमूद केले.
rohit pawar, raj thackeray, ramdas athawale
rohit pawar, raj thackeray, ramdas athawalesaam tv

- सुशिल थोरात

Rohit Pawar : राज ठाकरे (Raj Thackeray) जेव्हा भाजपच्या विरोधात बोलत होते विरोधात बोलायचं म्हणून ते बोलत नव्हते तर भाजपचे अनेक नेते तसे वागत होते तेव्हा ते सामान्य लोकांची आणि शेतकऱ्यांची बाजू घ्यायची ते भाषण लोकांसह मलाही आवडायचं. मात्र आता ते सामान्य लोकांचे प्रश्न हाती घेत नाही असा टाेला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या (gudi padwa) भाषणावरुन त्यांना लगावला आहे.

rohit pawar, raj thackeray, ramdas athawale
Railway Update : चार दिवसांचा मेगा ब्लॉक, जाणून घ्या काेणत्या एक्स्प्रेस झाल्या रद्द, रेल्वेचा मार्गही बदलला

आमदार राेहित म्हणाले भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांना जो काही संदेश द्यायचा आहे ताे राज ठाकरे अप्रत्यक्षरित्या मनसेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतात की काय असा प्रश्न मनसेच्या कार्यकर्त्यांना पडू लागला आहे. राज ठाकरेंनी लाेकांच्या प्रश्नांवर बाेलले पाहिजे असेही आमदार पवार यांनी नमूद केले. (Maharashtra News)

rohit pawar, raj thackeray, ramdas athawale
Chulivarcha Baba Video : चमत्कार सिद्ध करा, तीस लाख मिळवा ! चूलीवरचा बाबा म्हणाला... (पाहा व्हिडिओ)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीला माझ्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे. शिर्डी लोकसभेचा मतदार संघ आहे तो एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे आहे. तर श्रीकांत शिंदे सुद्धा खासदार आहेत मात्र त्या मतदारसंघात देखील गेल्या तीन महिन्यात भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री येऊन आमचाच उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करत असल्याचं रोहित पवारांनी म्हटलय.

शिर्डी मतदार संघात रामदास आठवले उभे राहतील हे त्यांनी स्वतः सांगितला आहे. त्यामुळे शिंदे गटाची ताकद कमी करण्याचे भाजपचे सर्व नेते आणि मित्र पक्षातले नेते करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

rohit pawar, raj thackeray, ramdas athawale
Congress Party News : राहूल गांधींच्या लाेकप्रियतेला माेदी घाबरले : पृथ्वीराज चव्हाण

आठवले साहेब मोठे नेते आहेत मात्र अशा पद्धतीने वक्तव्य करत असतील राष्ट्रवादीने त्यांच्याकडे यावं ते काही प्रमाणात हास्यास्पद आहे असे आमदार राेहित पवार यांनी म्हटलं. या विधानाकडे न बघता कृतीकडे बघा येथे काळात भाजपचे नेते शिंदे गटाचे खासदार आहे तिथे दावा करतील असेही रोहित पवारांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com