रोहित पवारांनी केलं गौतम अदानींच्या कारचं सारथ्य; राजकीय चर्चांना उधाण

आज बारामतीमधील विज्ञान केंद्राचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते करण्यात आलं.
रोहित पवारांनी केलं गौतम अदानींच्या कारचं सारथ्य; राजकीय चर्चांना उधाण
Rohit Pawar And Gautam AdaniSaam TV

प्राची कुलकर्णी -

बारामती : आज बारामतीमधील विज्ञान केंद्राचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि गौतम अदानी (Gautam Adani) एकाच मंचावर पाहायला मिळाले. मात्र, या कार्यक्रमाला अदानी यांना विमानतळावरुन कार्यक्रमस्थळी घेऊन जाण्यासाठी आलेल्या आमदार रोहीत पवारांनी (Rohit Pawar) स्वत: गौतम अदानी यांच्या गाडीचं सारथ्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

बारामती (Baramati) येथे राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत उभारण्यात आलेल्या सायन्स अँन्ड इनोव्हेशन अ‍ॅक्टिविटी सेंटरचे गुरुवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सुप्रिया सुळे आणि आमदार रोहीत पवार उपस्थित होते. शिवाय या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे देखील उपस्थित होते.

हे देखील पाहा -

दरम्यान, यावेळी रोहीत पवारांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, अदानी हे आपले पाहुणे आहेत, पाहुण्यांचं स्वागत करायला हवं असं रोहीत पवार म्हणाले. यावेळी रोहीत यांनी शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'यासंदर्भात शरद पवारांची काय इच्छा ते महत्वाचं आहे असं म्हणाले. तसंच विधानपरिषदेत नाराजांची काळजी घेतली जाईल, पाचव्या उमेदवारासाठी आणि काँग्रेससाठी ताकद लावणार पाचवा उमेदवार ताकद लावण्यासाठी दिला असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, बारामती सायन्स इन्होवेशन सेंटर उद्घाटन झाल्यानंतर रोहीत पवार गौतम अदानी हे सेंटर पहाण्यासाछी गेले होते. दरम्यान या कार्यक्रमादमरम्यान सभेच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजीत पवार, अनिल काकोडकर आणि गौतम अदानी उपस्थित होती यावेळी खासदार सुप्रीया सुळे यांच्या हस्ते अदानींचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात बोलताना सुप्रीया सुळे म्हणाल्या, 'गौतमभाई अदानींना पवार आणि बारामती नवीन नाही, आमचे २५ वर्षांचे संबंध आहेत , ते दिवाळीला बारामतीला येत असतात' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com