Panvel News : RPF जवान नसता, तर हा माणूस आज जिवंत नसता; थरारक घटना CCTVत कैद

Navi Mumbai News : ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली असून या घटनेनंतर त्या आरपीएफ जवानाचे सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.
Panvel News
Panvel News Saam Tv

सिद्धेश म्हात्रे

Panvel Train CCTV Footage : लोकल ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवेश करताना किंवा गाडीतून खाली उतरत असताना नागरिक अनेकदा घाई करतात आणि त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. नेहमीच रेल्वे स्थानकात प्रवाशांना काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या जातात.

मात्र असे असतानाही नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वेतून खाली उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करतात. आता असाच एक प्रकार नवी मुंबईच्या पनवेल स्थानकातून समोर आला आहे. सुदैवाने या प्रवाशाचे प्राण आरपीएफ जवानाने वाचवले आहेत. (Latest Marathi News)

Panvel News
Crime News : पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं; पतीचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

आरपीएफ जवानाने एका प्रवाश्याचे प्राण वाचवल्याची घटना पनवेल रेल्वे स्टेशनवर घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पनवेल रेल्वे स्थानकात नेत्रावती एक्सप्रेस पकडताना एका प्रवाश्याचा तोल गेला. तो व्यक्ती चालत्या ट्रेनमधून (Train) पडत असल्याचं कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानाने पाहिलं आणि त्यांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली. आरपीएफ जवानाने त्या रेल्वे प्रवाशाला मदतीचा हात देत त्याला तात्काळ रेल्वे डब्ब्यात ढकलले. (Panvel News)

यामुळे धावत्या एक्सप्रेस मधून पडणाऱ्या प्रवाशाला जीवनदान मिळाले. सदर घटना सिसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. आज (१९ मार्च) सकाळी ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली असून या घटनेनंतर त्या आरपीएफ जवानाचे सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com