कॉक्स अँड किंग्सकडून 110 कोटी रुपयांची फसवणूक; पर्यटन क्षेत्रात मोठं नाव

मे.टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याप्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉक्स अँड किंग्सकडून 110 कोटी रुपयांची फसवणूक; पर्यटन क्षेत्रात मोठं नाव
कॉक्स अँड किंग्सकडून 110 कोटी रुपयांची फसवणूक; पर्यटन क्षेत्रात मोठं नावSaam TV

मुंबई: पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी कॉक्स अँड किंग्सकडून (Cox & Kings) 110 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. मे.टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याप्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉक्स अँड किंग्सकडून 110 कोटी रुपयांची फसवणूक; पर्यटन क्षेत्रात मोठं नाव
16 नोव्हेंबर 2021 - राशिभविष्य

मे. टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. चे सहाय्यक उपाध्यक्ष विश्वरुप तिवारी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार, कॉर्पोरेशनच्या वतीने कॉक्स अँड किग्सला डिसेंबर २०११ ते जानेवारी २०१९ या कालावधीत ११० कोटी ४८ लाख रुपयांचे दीर्घ मुदतीच कर्ज देण्यात आले होते. ते कर्जाची रक्कम न देऊन कॉर्पोरेशनचे नुकसान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी कॉक्स अँड किंग्स लि. अजय अजीत पीटर केरकर यांच्यासह सहा जणांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखा यापूर्वी कॉक्स अँड किंग्स विरोधातील सात गुन्ह्यांचा तपास करत आहे, त्यात गैरव्यवहाराची रक्कम सुमारे २५०० कोटी रुपये आहे. यापूर्वी येस बँक, लक्ष्मी विलास बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सीस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक व खासगी गुंतवणूकदार कंपनी यांनी तक्रार केली आहे. याप्रकरणी ईडीनेही मनी लॉंडरींगप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत तिघांना अटक केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com