Rupali chakankar
Rupali chakankar Saam Tv

मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी

राज्याचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे.

मुंबई : राज्याचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali ChakanKar ) यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे हा धमकीचा फोन (Threat Call ) आलेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाकडून चाकणकरांना माहिती कळविण्यात आली आहे. ७२ तासांत जीवे मारू, असा धमकीचा फोन आला आहे. अहमदनगरमधील एका माथेफिरूनं ही धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर चाकणकरांनी पोलिसात तक्रार (Crime )दाखल केली आहे. (Rupali Chakankar Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

रुपाली चाकणकरांना याआधी धमकीचे फोन येऊन गेले आहेत. याआधी त्यांना दोनवेळा धमकीचे फोन येऊन गेले आहेत.विधवा प्रथा बंद करण्याच्या हेरवाड ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या पार्श्वभुमीवरून हा चाकणकरांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. चाकणकर यांच्यासहित नीलम गोऱ्हे यांनाही धमकीचा देण्यात आली आहे. फोनवरून धमकी देण्याचा आधी सदर माथेफिरूने २५ तारखेला ई-मेल करून धमकी दिली होती. अहमदनगर जिल्ह्यातील माथेफिरू व्यक्तीने मुख्यमंत्री, उपसभापती कार्यालय , स्त्री आधार केंद्र तसेच अन्य मान्यवरांनाही धमकीचे मेल पाठवले आहेत. माथेफिरूच्या मेलनंतर खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर चाकणकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे . तर नीलम गोऱ्हे यानी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Rupali chakankar
Satyendra Jain: मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या आरोग्यमंत्र्याना ED कडून अटक

कोण आहेत रुपाली चाकणकर ?

रुपाली चाकणकर या सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत.जुलै २०१९ साली त्यांना राष्ट्रवादीने महिला प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी दिली होती. मार्च २०२२ मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी अडीज वर्ष सांभाळली. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर चाकणकर यांनी सूत्र सांभाळली होती. गेल्या अडीज वर्षे महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळल्यानं त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पद देण्यात आले आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com