मंत्रिमंडळ विस्तारावरुन रुपाली चाकणकरांचे टीकास्त्र म्हणाल्या, 'मंत्रिमंडळात महिलांना स्थान नसणं हे...'

'आमच्या विरोधकांना महिलांबाबत काय वाटतं हे त्यांच्या वागणुकीवरुन दिसतं.'
Rupali chakankar
Rupali chakankarSaam TV

पुणे : देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा होत असताना देशाच्या सर्वोच्चस्थानी आदिवासी महिलेला संधी दिली जाते तर दुसरीकडे राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळाचा आज विस्तारात महिलांना स्थान दिलं नाही हे दुदैव असल्याची टिका महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केली. त्या आज राजगुरुनगर येथील महिला कार्यक्रमासाठी उपस्थीत होत्या यावेळी माध्यमांशी बोलत होत्या.

राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झालाय पुढच्या काळात महिलांवरील अत्याचार रोखणे आणि महिला सुरक्षेची जबाबदारी घेऊन महाराष्ट्र व्यवस्थेची जबाबदारी मंत्रीमंडळाने घ्यावे अशी आपेक्षाही चाकणकर यांनी व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडीओ -

आज तब्बल ३९ दिवसांनंतर शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार केला आहे. शिंदे गट ९ आणि भाजपचे ९ अशा एकून १८ आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र या मंत्रीमंडळामध्ये एकाही महिलेचा समावेश नाही. यावरुनच आता विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे.

अशातच आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा होत असताना देशाच्या सर्वोच्चस्थानी आदिवासी महिलेला संधी दिली जाते तर दुसरीकडे राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळाचा आज विस्तारात महिलांना स्थान दिलं नाही.

हे दुदैव असल्याचं त्या म्हणाल्या. तर आमच्या विरोधकांना महिलांबाबत काय वाटतं हे त्यांच्या वागणुकीवरुन दिसतं असल्याचं वक्तव्य करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकार वर टीका केली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com