वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ...; रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर

खोचक टोल्यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ...; रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर
वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ...; रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तरSaam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई : लखीमपूरमध्ये घडलेल्या हिंसाचारचा निषेध म्हणून आज महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदची Maharashtra Bandh हाक देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात सर्व ठिकाणी युतीचे नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळाले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकार आणि भाजपवर BJP जोरदार टीका करण्यात आली. दरम्यान, आजच्या महाराष्ट्र बंदवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस Amruta Fadnavis यांनी देखील महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावला. त्यांच्या या खोचक टोल्यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर Rupali Chakankar यांनी अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ...; रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर
आज वसुली चालू आहे की बंद?; अमृता फडणवीसांच खोचक ट्विट

अमृता फडणवीस या ट्वीटर किंवा अन्य माध्यमातून सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असतात. आज लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर सुद्धा अमृता फडणवीसांनी टीका केली आहे. आज वसुली सुरु आहे की बंद? असा खोचक सवाल महाविकास आघाडीला केला.

मात्र आता अमृता फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर Rupali Chakankar यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’, असं ट्वीट चाकणकर यांनी केलं आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.