चित्रा वाघ यांच्या टीकेवरती, रुपाली चाकणकरांचे उत्तर (पहा व्हिडीओ)

महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका.
चित्रा वाघ यांच्या टीकेवरती, रुपाली चाकणकरांचे उत्तर (पहा व्हिडीओ)
चित्रा वाघ यांच्या टीकेवरती, रुपाली चाकणकरांचे उत्तर (पहा व्हिडीओ)SaamTV

पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचं नाव चर्चेत असताना भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करत चाकणकार यांच्या निवडीला थेट विरोध केलाय, राज्यात महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरत आहेत मात्र राज्य महिला आयोगाला अजून पर्यंत अध्यक्ष नाही ही बाब लाजिरवाणं असून राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष (State Women's Commission Chairperson) लवकर नेमावा पण, महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका. नाहीतर प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, अशी टीका चित्रा वाघ यांनी ट्वीटरद्वारे केली आहे. त्यांच्या या टीकेचा रोख अर्थातच रुपाली चाकणकरांकडे होता. (Rupali Chakankar's reply to Chitra Wagh's criticism)

हे देखील पहा -

मात्र चित्रा वाघ Chitra Wagh यांच्या ट्वीटची (Tweet) साधी दखल देखील रुपाली चाकणकर यांनी घेतलेली दिसत नाही तसेच आपणाला अध्यक्षपदाबाबत अधिकृत कोणतेही पत्र किंवा घोषणा नाही त्यामुळे याबाबत अधिक काही बोलणार नसल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

चित्रा वाघ यांच्या टीकेवरती, रुपाली चाकणकरांचे उत्तर (पहा व्हिडीओ)
चंद्रकांतदादांनी संयम राखला असता तर...! गुलाबराव पाटलांचा पलटवार

वाढत्या अत्याचाराच्या घटनावरती एकत्रीत येवून काम करण गरजेच असून त्यासाठी महाविकास आघाडी सरकार MVA goverment चांगल्या प्रकारे काम करत आहे. तसंच प्रत्यंक पोलिस स्टेशन Police Station मध्ये निर्भया पथक (nirbhaya Pathak) स्थापण केलं असून त्या द्वारे आपण महिलांच्या सुरक्षेची काळजी घेत असल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com