SAAM-Sakal Survey : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलंय का? शिवसैनिकांनी सांगितली 'मन की बात'

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलंय का, या प्रश्नावर शिवसैनिकांनी सर्वेक्षणातून 'मन की बात' सांगितली आहे.
SAAM-Sakal Survey Uddhav Thackeray Shivsena Eknath Shinde
SAAM-Sakal Survey Uddhav Thackeray Shivsena Eknath ShindeSAAM TV

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांना पाठिंबा देणारे जवळपास ४० हून अधिक आमदार गुवाहाटीला गेले आहेत. मात्र, आपण अद्याप शिवसेनेत आहोत. आमची बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे सांगितलं आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं आहे का? असा आरोप बंडखोरांकडून होत आहे. याच प्रश्नावर साम आणि सकाळ वृत्त समूहानं राज्यभरातील शिवसैनिकांचं मत सर्वेक्षणाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वेक्षणातून शिवसैनिकांनी आपली 'मन की बात' केली आहे.

SAAM-Sakal Survey Uddhav Thackeray Shivsena Eknath Shinde
एक, दाेन गेलेत तिकडं, रत्नागिरीतील कडवट शिवसैनिक म्हणाले आमचं ठरलं...!

शिवसैनिकांना सर्वेक्षणात विचारलेले प्रश्न

पहिला प्रश्न: सध्या शिवसेनेत जे बंड सुरू आहे, यावरून शिवसेनेत फूट पडली असे वाटते का?

होय - ४३.३ टक्के

नाही - ४५.६ टक्के

सांगता येत नाही - ११. १ टक्के

दुसरा प्रश्न: तुमची साथ कोणाला?

उद्धव ठाकरे - ८२. ४ टक्के

एकनाथ शिंदे - १३.७ टक्के

तिसरा प्रश्न: बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडलं हा बंडखोरांचा आरोप तुम्हाला पटतो का?

हो - १५.६ टक्के

नाही - ७७.२ टक्के

सांगता येत नाही - ७.२ टक्के

चौथा प्रश्न: बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपण निदर्शने/आंदोलन करणार का?

हो - ५२.३ टक्के

नाही - ३४. १ टक्के

सांगता येत नाही - १३.६ टक्के

पाचवा प्रश्न: बंडखोर आमदारांना आपण पुन्हा मतदान करणार का?

हो - १२.५ टक्के

नाही - ७६.३ टक्के

सांगता येत नाही - ११. १ टक्के

SAAM-Sakal Survey Uddhav Thackeray Shivsena Eknath Shinde
मातोश्रीवर परत या..कृषिकन्येची मंत्री एकनाथ शिंदेंना सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्त हाक

साम आणि सकाळ वृत्त समूहानं सर्वेक्षणातून शिवसैनिकांच्या (Shivsena) मनात नेमकं काय आहे, याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांचं हिंदुत्व (Hindutva) उद्धव ठाकरे यांनी सोडलं असा बंडखोरांचा आरोप तुम्हाला पटतो का, असा प्रश्न विचारला. त्यावर या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या राज्यभरातील शिवसैनिकांनी उत्तरं दिली. बहुतांश शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने आपले मत नोंदवले आहे. ७७. २ टक्के शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोडलं नाही, असं मत नोंदवलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडल्याचा बंडखोरांचा आरोप १५.६ टक्के शिवसैनिकांना मान्य असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. तर याबाबत ७.२ टक्के शिवसैनिकांना काहीच सांगता आलेले नाही.

उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मान्य करणाऱ्यांपैकी दोन टक्के लोकांना उद्धव ठाकरेंचे हिदुत्व कमी झाल्याचे वाटते. बहुतेक शिवसैनिकांना वाटतंय की, उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून कदापि दूर गेलेले नाहीत.

श्रीराम पवार, संपादक-संचालक, सकाळ वृत्तसमूह

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोललं तर या दोन्ही गटाचा बघण्याचा दृष्टीकोन त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार आला आहे, असं एकंदरीत या सर्वेक्षणातून समोर येत आहे.

शीतल पवार, कार्यकारी संपादक, सकाळ

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com