
- सिद्धेश म्हात्रे / अमाेल कलये
Hapus Amba : रत्नागिरीत कर्नाटक येथील आंब्याची काेकणातील हापूस आंबा (alphonso mango) याच्या नावाखाली विक्री केली जात हाेती. याची माहिती स्थानिक अंबाबागातदारांना मिळाली. त्यामुळे आंबा बागायतदार नाराज झाले. त्यांनी कर्नाटकी आंब्याची (karnataka mango) विक्री करणा-यांची झाडाझडती घेतली. त्यामुळे आंबा बागायतदार आणि आंबा विक्रेते यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान यानंतर काही विक्रेत्यांनी कर्नाटकी आंबा काेकणचा हापूस आंबा म्हणून विकणार नाही असे सांगितल्यानंतर वादावर पडदा पडला. (Maharashtra News)
सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. बाजारात कोकणचा हापूस आंबा आणि कर्नाटकी आंब्याची आवक होत आहे. अवकाळी पावसामुळे यंदा कोकणातली हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घसरली आहे. दूसरीकडे कर्नाटकी आंब्याची आवक वाढल्याचे पहायला मिळतंय. यामुळे ग्राहकांना कर्नाटकी आंबा हा कोकणातील हापूस आंबा असल्याचं भासवून त्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.
दरम्यान वाशी येथील एपीएमसीतील संजय पिंपळे यांच्याशी साम टीव्हीने संवाद साधत काेकणातील हापूस आंबा आणि कर्नाटकी आंबा यामधील फरक समजून घेतला. पिंपळे म्हणाले या दाेन्ही आंब्यात साम्य असलं तरी मोठ्या प्रमाणावरती फरक देखील आहे. दोन्ही आंबे दिसायला साधारण सारखेच असेल तरी कोकणातील हापूस आंब्याची साल बारीक, आतून केसरी आणि चवीला साखरे सारखा गोड असतो. पिंपळे यांनी कर्नाटकी आंब्याची साल जाड, आतून पिवळा आणि चवीला पांचट असतो असे स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.