
काश्मिरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे अतिरेक्यांशी लढताना भारताच्या ३ जवानांना वीरमरण आले. त्याचदिवशी जी २० शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींवर भाजप कार्यालयात जंगी स्वागत करत पुष्पवृष्टी करण्यात आली. पंतप्रधान मोदींच्या याच कार्यक्रमावरुन ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून सडकून टीका करण्यात आली आहे.
काय आहे सामना अग्रलेख?
"देशाच्या अखंडतेविषयी, एकात्मतेबाबत मोदी (PM Narendra Modi) सरकारने दिलेली सर्व वचने फोल ठरली आहेत. जम्मू-कश्मीर हा तर संवेदनशील विषय आहे. तेथे आजही जवानांच्या रक्ताचे सडे पडत आहेत आणि येथे राज्यकर्ते स्वतःवर फूल- पाकळ्यांचे सडे पाडण्यात धन्यता मानत आहेत... अशा शब्दात सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
तसेच संसदेच्या विशेष सत्रात चर्चा जरा यावरही होऊ द्या. जम्मू- कश्मीरच्या भूमीवर हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना आमचे अभिवादन. फुलांचे सडे सुकून जातील, तुमच्या रक्ताचे सडे देश सदैव स्मरणात ठेवील, असेही या अग्रलेखात म्हणले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यावर दिल्लीत (Delhi) जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. फुलांचा वर्षाव होत असताना मोदी भाजप (BJP) कार्यकर्त्यांना सुहास्य वदनाने हात वगैरे उंचावून अभिवादन करत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. मोदींवर फुलांचे सडे उधळले जात असताना जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आपल्या जवानांच्या रक्ताचे सडे पडत होते. लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी घुसले व जवानांची त्यांच्याशी चकमक झाली.
त्यात भारतीय सैन्याच्या एका कर्नल आणि मेजरसह चार जांबाज अधिकारयांना हौतात्म्य प्राप्त झाले. कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष ढोनक आणि डीएसपी हुमायून भट अतिरेक्यांच्या हल्ल्यात वीरगतीस प्राप्त झाले. जम्मू-कश्मीरमधील (Jammu- Kashmir) स्थिती बरी नाही व मोदी सरकार 'जी-20'च्या यशाने हुरळून आणि विरघळून गेले आहे. जवान अतिरेक्यांशी प्राणपणाने लढत असताना केंद्रीय निवडणूक समितीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले.
मोदींनी 'जी-20'चे जे अफाट यश संपादन केले, त्यामुळे त्यांच्यावर 'धो-धो' फुले उधळली गेली. त्या वेळी तेथे गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. कर्नल, मेजर, डीएसपीच्या मृत्यूचे सावट या नेत्यांच्या चेहऱ्यावर नव्हते. निदान राजनाथ सिंह यांनी तरी ते दुःख व्यक्त करण्याची कृती करायला हवी होती.... असे या अग्रलेखामध्ये म्हणले आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.