Political News : भाजपची 'एक्सपायरी डेट' 2024 पर्यंत, सामनातून घणाघात; PM मोदी-शाहांवरही टीकास्त्र

Sanjay Raut on Modi-Shah : पंतप्रधान सव्वादोन तासांच्या भाषणात मणिपूरवर ते फक्त चार मिनिटे बोलले.
Sanjay Raut on Modi-Shah
Sanjay Raut on Modi-Shah

Saamana Rokhthok News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणांवर विरोधक कडाडून टीका करत आहेत. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्ताव विरोधकांना आणला होता. मात्र या अविश्वास प्रस्तावावर मणिपूर वगळता काँग्रेसवर टीका करण्यापलिकडे मोदी बोलले नाहीत, अशी टीका विरोधक करत आहेत. मोदींच्या भाषणावर शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र सामनातूनही सडकून टीका करण्यात आली आहे.

मोदींनी त्यांच्या भाषणातून काँग्रेसला मोठे केले. तसेच मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, असं म्हणणाऱ्या मोदींना, ते सूर्याची मालक नाहीत, असा टोलाही सामनाच्या रोखठोकमधून लगालवण्यात आला आहे.

सत्ता भोगूनही मोदींच्या यातना कायम

पंतप्रधान सव्वादोन तासांच्या भाषणात मणिपूरवर ते फक्त चार मिनिटे बोलले. बाकी सर्व पुराण तेच तेच आणि तेच त्यांनी काँग्रेसवरच लावले. या त्यांच्या मानसिक यातना आहेत. पंडित नेहरूंचे जागतिक मोठेपण, काँग्रेसचे स्वातंत्र्य लढ्य़ातील कार्य या मोदींच्या यातना आहेत व दहा वर्षे सत्ता भोगूनही मोदी यातनांतून दूर होऊ शकलेले नाहीत. मणिपूर समस्येचे खापर त्यांनी पंडित नेणहरूंवर फोडले, असं रोखठोकमध्ये म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut on Modi-Shah
Sharad Pawar Ajit Pawar Meet: शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट; काँग्रेस-ठाकरे गटाच्या नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाले...

म्हणून मोदी-शाहांची चिडचिड

दहा वर्षांपूर्वीचे राहुल गांधी आज राहिलेले नाहीत. सत्यवचनी व बेडर गांधींसमोर मोदी-शहांच्या नेतृत्वाची कसोटी लागत आहे. अमित शहा यांनी म्हणे लालबहाद्दूर शास्त्रींचा विक्रम मोडणारे प्रदीर्घ भाषण केले. शहांच्या भाषणात धमक्या, इशारे, काँग्रेसला दूषणे याशिवाय दुसरे काय होते? शहा म्हणजे कोणी स्वातंत्र्य लढा आणि यातून तावून सुलाखून बाहेर पडलेले नेतृत्व नव्हे. शहा हे मोदींची वैयक्तिक गरज म्हणून गृहमंत्रीपदी बसवले आहेत. हुकूमशहाला त्यांच्या बेकायदेशीर आदेशांची अंमलबजावणी करायला एक जवळचा अंमलदार लागतो. पण हे सर्व 2024 नंतर त्यांच्या हाती राहणार नाही. हीच चिडचिड शहा आणि मोदींच्या प्रदीर्घ भाषणांतून दिसली. (Political News)

मोदींना मणिपूरवर तोंड उघडावे

अविश्वास ठराव लोकसभेत आणला नसता तर मोदींनी मणिपूरवरचे मौन कधीच तोडले नसते. अविश्वास ठराव कोसळला. तो कोसळणारच होता. यात सरकार पक्षाने 'जितंमय्या'चा काय? मोदींना अखेर मणिपूरवर तोंड उघडावे लागले व अविश्वास ठरावाचा हेतू सफल झाला. भाजपमध्ये मोदीनाम व दंगलीशिवाय दुसरे एखादे प्रॉडक्ट असेल तर त्यांनी ते बाजारात आणावे. या प्रॉडक्टची 'एक्सपायरी डेट' 2024 पर्यंत आहे व त्यानंतर भारताचा राजकीय बाजार पूर्णपणे बदललेला असेल.

Sanjay Raut on Modi-Shah
Pune News: पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार: नितीन गडकरी

मोदींची वर्तन सामान्य घरातील मुलाप्रमाणे नाही

म्हणतात, सामान्य घरातला मुलगा पंतप्रधान म्हणून बसला, म्हणून तुमची झोप उडाली. सामान्य मुलाप्रमाणे मोदींचे वर्तन गेल्या दहा वर्षांत दिसले नाही. सामान्य घरातील मुलाने सरकारी पैशाने स्वतःसाठी वीस हजार कोटींचे विमान खरेदी केले आहे व ते दहा लाखांचे सूट परिधान करतात. नेहरू वगैरे लोक श्रीमंतीत जन्मास आले व सत्तेवर येताच साधेपणाने जगले. नेहरूंनी तर त्यांची संपत्ती देशाला दान केली. कृष्णाचा मित्र हा गरीब सुदामा होता. मोदींचे मित्र कोण व त्या मित्रांसाठी मोदी काय काय करतात हे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com