Breaking! ह्रदय शस्त्रक्रियेसाठी वाझेकडून रुग्णालय बदलण्यासाठी अर्ज दाखल

वाझेने बॉम्बे हॉस्पिटल व ओक्हार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास परवानगी मिळावी म्हणून अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
Breaking! ह्रदय शस्त्रक्रियेसाठी वाझेकडून रुग्णालय बदलण्यासाठी अर्ज दाखल
Breaking! ह्रदय शस्त्रक्रियेसाठी वाझेकडून रुग्णालय बदलण्यासाठी अर्ज दाखल Saam Tv news

सुरज सावंत

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी (Mansukh hiren death case) अटकेत असलेल्या सचिन वाझेने(Sachin Waze) न्यायालयात रुग्णालय बदलण्यासाठी अर्ज केला आहे. ह्रदय विकाराचा त्रास असल्याने सचिन वाझेला भिवंडीच्या सुराना रुग्णालयात (Surana Hospital) दाखल करण्यात आले होते. त्याच्या ह्रदयात पाच ठिकाणी ब्लाँकेज दाखवण्यात आले आहेत. त्यातील ३ ब्लॉक हे ९०टक्क्यांच्या आसपास आहेत.

हे देखील पहा-

सचिन वाजेवर अँन्जोप्लास्टि करण्यासंदर्भात डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. पण वाझे मात्र ओपनहार्ट सर्जरी करण्यावर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. ओपनहार्ट सर्जरीला डॉक्टरांनी नकार दिल्याने वाझेने न्यायालयात रुग्णालय बदलीसाठी अर्ज केला आहे. वाजेने बॉम्बे हॉस्पिटल व ओक्हार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात त्याच्यावर ह्दय शस्त्रक्रिया (heart surgery) करणं आवश्यक असल्याचं त्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. सचिन वाझेच्या वकिलांनी कोकीळाबेन, (kokilaben hospital) सुराना किंवा सैफी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्यावी अशी न्यायालयाकडे विनंती केली होती. त्यावेळी न्यायालयाने सुराना रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी दिली होती. तसेच, उपचारानंतर १५ दिवसात काय उपचार करण्यात आले, त्याची कागदपत्र जमा करण्याचे न्यायाधिशांनी आदेश दिले होते.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com