शेतकरी चळवळीच्या इतिहासातील "सर्वात काळा दिवस"- सदाभाऊ खोत

तीन कृषी कायदे मागे घेण्याची दुर्दैवी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
शेतकरी चळवळीच्या इतिहासातील "सर्वात काळा दिवस"- सदाभाऊ खोत
शेतकरी चळवळीच्या इतिहासातील "सर्वात काळा दिवस"- सदाभाऊ खोतSaam TV

सुशांत सावंत

मुंबई - तुम्ही जर तुमचं भल करणाऱ्याच्या मागं भक्कम उभं राहिला नाहीत तर तुमच्या जीवावर उठणारे जिंकतात. शेतकरी (Farmer) चळवळीच्या इतिहासातील "सर्वात काळा दिवस" म्हणुन आजच्या दिवसाची नोंद होईल. तीन कृषी कायदे (3 Farm Law) मागे घेण्याची दुर्दैवी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. हा आघात शेतकऱ्यांना सहन होण्यापलिकडचा आहे. आता कोठे शेतकऱ्यांच्या अंधारलेल्या जीवनात प्रकाशाची चार किरणे पसरण्याची शक्यता तयार झाली होती. पण कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांच्या अभद्र युतीने ही अंधुकशी शक्यता हाणून पाडली अशी टीका सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे.

हे देखील पहा -

पुढे ते म्हणले की, गेले वर्षभर अपप्रचाराचा गदारोळ उठवून शेतकरी स्वातंत्र्याच्या नरडीचा घोट घेण्यात वरील पक्ष यशस्वी झाले. खरेतर केंद्र सरकारने आतापर्यंत ठामपणे या शेतकरी विरोधी पक्षांना दाद दिली नव्हती. पण अखेरीस केंद्र सरकार नमले. कदाचित आगामी निवडणुका लक्षात घेऊन केंद्राने हे पाऊल उचलले असेल. पण हा निर्णय चुकीचा आहे. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पारतंत्र्याच्या पाताळात गाडणारा आहे.

आता परत एकदा नव्या जोमाने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यातील मार्केट कमिट्या शेतकऱ्यांची कत्तल सुरू करतील. राजकीय दलाल आणि अडत्यांचे शेतकऱ्यांना लुटणारे अड्डे बळकट होतील. मार्केट कमिटीतील शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्या जळवांनी आता सुटकेचा निःश्वास टाकला असेल. मोदीजी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा या नराधमांच्या हातात सोपवून तुम्ही फार मोठी चूक केली आहे असे देखील खोत यावेळी म्हणले.

शेतकरी चळवळीच्या इतिहासातील "सर्वात काळा दिवस"- सदाभाऊ खोत
शेतकरी आंदोलनाला एक वर्षे पूर्ण, पाहा शेतकरी आंदोलनावर राजू शेट्टी काय म्हणतात

युगात्मा शरद जोशी म्हणायचे, पिंजऱ्यात उंदीर सापडल्यानंतर त्याची जी अवस्था होते, तशी अवस्था शेतकऱ्यांची बाजार समितीत शेतीमाल घेऊन आल्यानंतर होते. या समित्या म्हणजे शेतकऱ्यांचे कत्तलखाने आहेत. मोदीजी हे कत्तलखाने बंद होतील. शेतकऱ्यांना पाहिजे तिथे आपला कष्टाने पिकविलेला शेतमाल विकता येईल अशी स्पर्धात्मक व्यवस्था तयार होईल ही आशा आता मावळली आहे. आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांच्या फौजा नव्या जोमाने शेतकऱ्यांच्या वावरात शिरतील. त्याचा घाम गाळून पिकवलेला शेतमाल हव्या त्या दरात लुटून नेतील.स्वातंत्र्याच्या नवजात अर्भकाला गर्भातच नख लावण्याचे अमानवी कृत्य विरोधी पक्षाने केले आहे अशी टीका देखील सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com