
रुपाली बडवे
मुंबई : ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरू जग्गी वासुदेव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन 'माती वाचवा' या आपल्या जागतिक मोहिमेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या मोहिमेला शुभेच्छा देताना पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांविषयाही सांगितले. मातीची गुणवत्ता तसेच संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या या मोहिमेला महाराष्ट्राचा पाठिंबा असल्याचेही सदगुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितले.
सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आज वर्षा येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,राघवेंद्र शास्त्री व त्यांचे सहकारी उपस्थित होते. माती वाचवा हा संदेश देत सद्गुरू जग्गी हे २७ देशांची यात्रा करून आज भोपाळ, नाशिक मार्गे मुंबईत दाखल झाले. यावेळी या अभियानविषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देखील सदगुरु जग्गी यांच्याकडून मोहिमेदरम्यान आलेले अनुभव जाणून घेतले. पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात व्यापक स्तरावर काम सुरू आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी ही मोहीम सुरू केली असून आत्तापर्यंत 27 देशांमधून 25000 किमीची यात्रा त्यांनी पूर्ण केली असून देशातल्या 5 राज्यांतून फिरत ते महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.
कोण आहेत सदगुरू जग्गी वासुदेव ?
सदगुरू जग्गी वासुदेव हे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. जग्गी वासुदेव यांनी अनेक योग केंद्राची स्थापना केली आहे. भारताव्यतिरिक्त त्यांनी अमेरिकेतही योग केंद्राची स्थापना केली आहे. हस्त्राब्दी विश्व शांती संमेलनात अमेरिकेच्या जागतिक आर्थिक मंचावर २००६ आणि २००७ साली सहभाग नोंदवला होता. जग्गी वासुदेव यांना सद्गुरू या नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म कर्नाटकातील म्हैसूर येथे झाला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.