Sakinaka Rape Case: राजावाडी रूग्णालयाबाहेर भीम आर्मीची निदर्शने

साकीनाका येथे एका पीडीतेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराप्रकरणी भीम आर्मी मुंबई प्रदेशच्या वतीने राजावाडी रूग्णालयात जाऊन पीडीत कुंटूंबाची भेट घेतली.
Sakinaka Rape Case: राजावाडी रूग्णालयाबाहेर भीम आर्मीची निदर्शने
Sakinaka Rape Case: राजावाडी रूग्णालयाबाहेर भीम आर्मीची निदर्शनेविनोद तळेकर

मुंबई: साकीनाका येथे एका पीडीतेवर झालेल्या सामूहिक अत्याचारानंतर तिचा आज दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी भीम आर्मी मुंबई प्रदेशच्या वतीने राजावाडी रूग्णालयात जाऊन पीडीत कुंटूंबाची भेट घेतली. यावेळी पीडीत कुंटूंबाला भेटण्यासाठी भीम आर्मीचे मुंबई प्रदेशचे शिष्टमंडळ गेले असता त्यांना पोलीसांनी अडवले. भीम आर्मीच्या कार्यकत्यांनी दिलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. अखेर पोलीसांनी पीडीत कुंटूंबाची भेट करून दिली. (Sakinaka Rape Case: Bhim Army protests outside Rajawadi Hospital)

हे देखील पहा -

पिडीत कुंटूंबाला भेटून त्यांना दिलासा देण्यात आला. पीडीत कुंटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे. केंद्र सरकार मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद अशा यावेळी घोषणा देण्यात आल्या. पिडीत कुंटूंबाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, शक्ती कायद्याची त्वरीत अंमलबजावणी करा अशी मागणी भीम आर्मीच्या मुंबई प्रमुख उपाध्यक्ष योगीनीताई पगारे यांनी केली आहे.

Sakinaka Rape Case: राजावाडी रूग्णालयाबाहेर भीम आर्मीची निदर्शने
पोलीस बदल्यांवरून पोलीस दलात नाराजी; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

या आंदोलनात महादू पवार, अविनाश गरूड, विकी शिंगारे, दिनेश शर्मा, क्रांती खाडे, तृप्ती वाघमारे, बालाजी घाडगे तसेच आझाद समाज पार्टीचे मुंबई अध्यक्ष कैलास जैस्वार आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com