Sakinaka Rape case: इतकी क्रुरता येते कुठून? किशोरी पेडणेकर

डॉक्टर महिलेला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.
Sakinaka Rape case: इतकी क्रुरता येते कुठून? किशोरी पेडणेकर
Sakinaka Rape case: इतकी क्रुरता येते कुठून? किशोरी पेडणेकर SaamTv news

'' गुरुवारची (९ सप्टेंबर) घटना घडल्यानंतर महिलेला राजावाडी रुग्णालयात आणण्यात आलं. महिलेची प्रकृती अत्यवस्थ असून सध्या महिलेची आई सध्या तिच्या सोबत आहे. त्यांनीच मला आता सांगितलंय 'महिला 10 ते 12 वर्षापासून त्या पुरुषाबरोबर रहात होती. त्यांच्यात भांडण सुरू होतं. तो तिला मारहाण करत असल्याचं कळल्यावर स्थानिकांनी पोलिसांना बोलावून घेतलं. त्यानंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं." अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी दिली आहे. रुग्णालयात जाऊन त्यांनी पिडीतेची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांना तिच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

हे देखील पहा-

पोलीस घटनास्थळी जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन महिलेला रुग्णालयात दाखल केलय. तिची स्थिती नाजूक आहे. पण इतकी क्रूरता का येते ? पोलिसांनी तत्परता दाखवली म्हणून महिलेचे प्राण वाचलेत. पिडीतेचा खूप रक्तस्त्राव झाला आहे. डॉक्टर महिलेला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. अडीच ते तीन तास शस्त्रक्रिया चालली. खूप रक्त गेलंय. शरीर कशी साथ देतंय, हा महत्वाचा मुद्दा आहे. एवढं वाईट अवस्थेतलं रुग्ण आजवर पाहिलेलं नाही. असेही त्यांनी म्हंटल आहे.

Sakinaka Rape case: इतकी क्रुरता येते कुठून? किशोरी पेडणेकर
साकीनाका बलात्कार प्रकरणाचं गुढ वाढलं; कटात दोघे सामील असल्याचा संशय

दरम्यान, मुंबईतील साकीनाक्यातील खैरानी रोड परवा एका 30 वर्षीय महिलेवर बलात्काराची झाल्याचे वृत्त समोर आले. याप्रकरणी साकीनाका पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून एका व्यक्तीला अटकही केली आहे. बलात्कारानंतर संशयिताने महिलेच्या गुप्तांगात रॉड घातल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबरला साकीनाकाच्या खैरानी रोड भागात पिडीता बेशुद्धावस्थेत आढळून आली. पोलिसांनी उपचारासाठी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलं. पीडितेची प्रकृती परिस्थिती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com