सीमावाद चिघळला असताना महाराष्ट्र सरकार कर्नाटकवर मेहरबान; राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांचे वेतन कर्नाटक बँकेतून होणार

Maharashtra Vs Karnataka News: महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते निवृत्ती वेतन हे कर्नाटक बॅंकेतून होणार आहेत.
Karnataka Bank News
Karnataka Bank NewsSaam TV

Karnataka Bank News:कर्नाटक राज्याबरोबर महाराष्ट्राचा सीमा वादाचा मुद्दा चिघळला असताना दुसरीकडे कर्नाटक बॅंकेवर महाराष्ट्र राज्य सरकार मात्र मेहरबान झालेलं आहे. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते निवृत्ती वेतन हे कर्नाटक बॅंकेतून होणार आहेत. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना कर्नाटक बॅंकेत खाती उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. (Karnataka Latest News)

Karnataka Bank News
Pune News: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला, मनसेने पुण्यात कर्नाटकच्या बसला काळं फासलं

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या वित्त विभागाने ७ डिसेंबरला, बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जाहिर केला आहे. कर्नाटक, जम्मू काश्मिर आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स यांच्याशी सरकारने करार केला आहे. त्यामुळे आहरण आणि संवितरण अधिकारी यांचे वेतन तसेच भत्ते प्रयोजनासाठीचे सरकारचे खाते कर्नाटक बॅंकेत उघडले जाणार आहे.

तसेच निवृत्ती वेतन प्रदान करण्यासंदर्भातही कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक खाते कर्नाटक बॅंकेत उघडण्यास राज्य सरकारने संमती दिली आहे. (Maharashtra-Karnataka Border Dispute)

राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन आणि भत्ते यांच्या नियोजनासाठी राज्य सरकारच्या सूचीत पूर्वी १५ बँका होत्या. आता कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर तसेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अशा ३ बँकांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकार आपल्या ३८ विभागांच्या योजना चालवण्यासाठी सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी बँकेत खाते उघडण्याची अनुमती देते. सरकारचे असे खाते त्या त्या विभागाचे आहरण आणि संवितरण अधिकार चालवत असतात. तसेच राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते तसेच निवृत्ती वेतनाच्या नियोजनासाठी बँकांना सरकारशी करार करावे लागतात. (Latest Marathi News)

Karnataka Bank News
अरे ला कारे नं उत्तर द्या, तक्रारी कसल्या करताय?; बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला झाल्यानंतर अजित पवार संतापले

६ डिसेंबरला बेळगाव येथे महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला होता, त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला होता. हिरबागेवाडी टोलनाक्यावर ही घटना घडली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. अशात सीमावादाचा मुद्दा चिघळला असताना महाराष्ट्र सरकार कर्नाटक राज्यावर मेहरबान झालेले दिसते. कारण, राज्य सरकारने आता कर्नाटक बँकेत सरकारी कर्मचाऱ्यांची खाती उघडण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com