१ मे पासून सलून-ब्यूटी पार्लर सेवा महागणार; पहा किती होणार दरवाढ

Salon and Beauty Parlour Price Hike: नागरिकांनी देखील दरवाढीला सहकार्य करावे असे अवाहन सलून अॅन्ड ब्यूटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद (Somnath Kashid) यांनी केले आहे.
१ मे पासून सलून-ब्यूटी पार्लर सेवा महागणार; पहा किती होणार दरवाढ
Salon and Beauty Parlour Price Hike In Maharashtra From 1st May, Salon and Beauty Parlour Price Hike NewsSaam Tv

मुंबई: वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना आणखी एक तडाखा बसणार आहे. येत्या १ मे पासून राज्यातील सर्व सलून (Salon) व ब्यूटी पार्लर (Beauty Parlour) सेवांच्या किंमतीमध्ये वाढ (Price Hike) होणार आहे. त्यामुळे केस कापणे, दाढी करणे, यांसह फेशियल सारख्या अनेक सेवा महागणार आहेत. सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांची ऑनलाईन राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत दरवाढ करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा आणखीन हलका होणार आहे. (Salon and Beauty Parlour Price Hike In Maharashtra From 1st May)

हे देखील पहा -

शहरी आणि ग्रामीण भागात 30% दरवाढीचा निर्णय होणार आहे. 1 मे कामगार दिनापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. नागरिकांनी देखील दरवाढीला सहकार्य करावे असे अवाहन सलून अॅन्ड ब्यूटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद (Somnath Kashid) यांनी केले आहे. दररोजच्या विविध प्रकारचा वाढत्या महागाईमुळे दरवाढ होत असल्याने राज्यभरातून दरवाढ करण्यासाठी सलून आणि ब्यूटी पार्लर व्यावसायिकांची मागणी होत होती. या असोसिएशनचे 52000 सलून आणि ब्यूटी पार्लर चालक सदस्य आहेत. अशी माहिती सोमनाथ काशिद यांनी दिली आहे.

Salon and Beauty Parlour Price Hike In Maharashtra From 1st May, Salon and Beauty Parlour Price Hike News
शेतीच्या बांधाच्या वादातून कोयत्याने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दरवाढीचे प्रमुख कारणे:

1) ब्युटी प्रॉडक्ट/पेट्रोल/गॅस सिलेंडर/खाद्यतेल/शाळांची फी या व सर्व प्रकारची वाढती दरवाढ

2) कोरोना परिस्थिती व लॉकडाऊन नंतर व्यवसायांमध्ये 50% ग्राहकांची झालेली कमी व वाढती बेरोजगारी

3) सरकारचे कायमच नाभिक समाज व सलून व ब्यूटी पार्लर व्यवसायिक यांच्या मागण्यांकडे सुरू असलेले दुर्लक्ष

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com