संभाजीराजेंनी घेतली फडणवीसांची भेट; नवा पक्ष स्थापन करण्याबद्दल म्हणाले...

Sambhaji Chhatrapati Meet Devendra Fadnavis : यावेळी संभाजीराजेंनी पत्रकारांशी बोलताना नवा पक्ष स्थापन करण्याबाबत महत्वाचं विधान केलंय.
संभाजीराजेंनी घेतली फडणवीसांची भेट; नवा पक्ष स्थापन करण्याबद्दल म्हणाले...
Sambhaji Chhatrapati Meet Devendra Fadnavis On Sagar Bunglow, Chhatrapati Sambhajiraje Latest Marathi NewsTwitter/@YuvrajSambhaji

मुंबई: छत्रपती संभाजीराजे भोसले हे भाजपने शिफारस केलेले राष्ट्रपती नियुक्त माजी राज्यसभा सदस्य (खासदार) आहेत. त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. संभाजीराजेंची (Sambhaji Chhatrapati) राजकारणात पुढील भूमिका काय असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याचप्रमाणे ते नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय. अशात संभाजीराजेंनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीमागे (Meeting) अनेक अर्थ लावले जात आहेत. यावेळी संभाजीराजेंनी पत्रकारांशी बोलताना नवा पक्ष स्थापन करण्याबाबत महत्वाचं विधान केलंय. (Sambhaji Chhatrapati Meets Devendra Fadnavis in sagar bungalow for political meeting and thanksgiving)

हे देखील पाहा -

पत्रकारांशी बोलताना खासदार संभाजी महाराज म्हणाले की, माझा खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे ज्यांनी मला याची संधी दिली होती ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे आभार मानन्यासाठी मी इथे आलो. या सहा वर्षांच्या कार्यकाळात मला अनेक कामं करता आली. अनेक गडकिल्ल्याचं संवर्धन आणि विकासकामं करता आली. महाराष्ट्रात आणि देशभरात मला फिरता आलं. काम करायला मिळालं. छत्रपती या नात्यानं काम करता आलं. त्यामुळे मी ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानन्यासाठी इथे आलो आहे असं ते म्हणाले. (Chhatrapati Sambhajiraje Latest Marathi News )

Sambhaji Chhatrapati Meet Devendra Fadnavis On Sagar Bunglow, Chhatrapati Sambhajiraje Latest Marathi News
उत्तर प्रदेश सरकारचं मुंबईत कार्यालय; राज ठाकरेंची भूमिका काय? दरेकरांनी सांगितलं...

नवा पक्ष स्थापन करणार का?

संभाजीराजेंच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, राजकारणात यायचंय हे निश्चित आहे. मराठा समाजासोबत मी ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्नशील राहिन. कारण मी बहुजन समाजाचं प्रतिनिधीत्व करतो. माझ्या नव्या पक्षाबद्दल किंवा पुढील राजकीय वाटचालीबाबत मी १२ तारखेला सविस्तर सांगेन असं ते म्हणाले आहेत. एकूणच संभाजीराजे नवा पक्ष स्थापन करणार का? संभाजीराजे हे भाजपमध्येच राहणार की महाविकास आघाडीत प्रवेश करणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या १२ मे ला मिळण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.