छत्रपतींच्या अपमानचा बदला घेणाऱ्या आमदारांचे आभार; शिवसेना भवनासमोर संभाजीराजे समर्थकांची बॅनरबाजी

'आज पुन्हा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा, राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे २०२४ बाकी है!'
छत्रपतींच्या अपमानचा बदला घेणाऱ्या आमदारांचे आभार; शिवसेना भवनासमोर संभाजीराजे समर्थकांची बॅनरबाजी

मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर (Shivsena) बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरद्वारे राजे समर्थकांनी शिवसेनेवर निशाणा साधला असून 'गनिमी कावा वापरून छत्रपतींचा अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदारांचे आभार' असा मजकूर या बॅनर वरती छापण्यात आला आहे.

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha) भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विशेष करून कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. तर शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाल्यामुळे शिवसेनेला आता मराठा संघटनाकडून तसंच संभाजीराजे समर्थकांकडून टार्गेट करण्यात येत आहे.

संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी राज्यसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द मोडला, असा आरोप संभाजीराजे छत्रपतींनी केला होता. त्यामुळे आता या निवडणुकीत राजेंना डावलून दिलेला सेनेचा उमेदवार पराभूत होऊन भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबईसह नवी मुंबईत छत्रपती संभाजी महाराज समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे. या बॅनरच्या माध्यमातून शिवसेना व मुख्यमंत्र्यांना टोला लगावण्यात आला आहे. "शिवरायांच्या गनिमीकावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार, आज पुन्हा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा' अशा आशयाचा मजकुर या बॅनरवर लिहण्यात आला आहे. तसंच राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे २०२४ बाकी है! असही या बॅनरवर लिहलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com