'माझं नाव दाऊद नसून जन्मापासून ज्ञानदेव आहे', समीर वानखेडेंच्या वडिलांचा खुलासा (Video)

शाळा, कॉलेज, एलएलबीला प्रवेश घेण्यापासून निवृत्त होईपर्यंत माझा नाव ज्ञानदेवच आहे.
'माझं नाव दाऊद नसून जन्मापासून ज्ञानदेव आहे', समीर वानखेडेंच्या वडिलांचा खुलासा (Video)
'माझं नाव दाऊद नसून जन्मापासून ज्ञानदेव आहे', समीर वानखेडेंच्या वडिलांचा खुलासा (Video)Saam Tv

मुंबई -  समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचा दाखला कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी दिला होता. नवाब मलिक यांनी टि्वटरवर एक जन्म दाखला शेअर करुन समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचा दावा केला आहे.आता समीर वानखेडे यांच्या वडिलांनी खुद्द या बद्दल खुलासा केला आहे. "माझं नाव दाऊद नसून ज्ञानदेव आहे आणि जन्मापासून ज्ञानदेव वानखेडे आहे" असे समीर वानखेडे यांच्या वडिलांनी स्पष्ट केले आहे.

"माझ नाव दाऊद कधीही नव्हते जन्मापासून माझे नाव ज्ञानदेव वानखेडेच आहे. शाळा, कॉलेज, एलएलबीला प्रवेश घेण्यापासून निवृत्त होईपर्यंत माझा नाव ज्ञानदेवच आहे. कोणी तरी हा खोडकरपणा केला आहे असे देखील ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले आहे. आज नवाब मलिक यांनी ट्विटरवर एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला आहे. याला पहचान कौन असा कॅप्शन दिलं आहे. 

'माझं नाव दाऊद नसून जन्मापासून ज्ञानदेव आहे', समीर वानखेडेंच्या वडिलांचा खुलासा (Video)
संपूर्ण देशातून अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

दरम्यान, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा जन्म दाखला (Birth Certificate) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून वानखेडे प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा असून, या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे. असा इशारा समीर वानखेडे यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com