समीर वानखेडे शाळेच्या दाखल्यात मुस्लिमच!नवाब मलिक यांचा दावा

या दाखलात समीर वानखडे यांचे नाव समीर दाऊद वानखडे आणि धर्म मुस्लिम असे नमूद करण्यात आले आहे.
समीर वानखेडे शाळेच्या दाखल्यात मुस्लिमच!नवाब मलिक यांचा दावा
समीर वानखेडे शाळेच्या दाखल्यात मुस्लिमच!नवाब मलिक यांचा दावाSaam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई - अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात (High Court) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखडे शाळेचा दाखला दिला आहेत.

हे देखील पहा -

या दोन्ही कागदपत्रांमध्ये वानखेडे हे मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे. या दोन्ही दाखलयात समीर दाऊद वानखडे असे नाव देखील आहे. समीर वानखडे यांचे सेंट जोसेफ हायस्कुल वडाळा इथे पहिली ते चौथी शिक्षण झाले आहे. त्यात शाळा सोडताना दाखला 1989 चा आहे. या दाखलात समीर वानखडे यांचे नाव समीर दाऊद वानखडे आणि धर्म मुस्लिम असे नमूद करण्यात आले आहे. घर बदलले म्हणून समीर वानखडे यांनी शाळा बदलली. त्या शाळा सोडण्याच्या दाखला देखील नवाब मलिक यांनी दिला आहेत.

दरम्यान, समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मलिक यांनी उच्च न्यायालयात ही महत्वाची कागदपत्रे सादर केली आहे. मलिक यांनी समीर वानखेडे यांचा शाळा प्रवेशाचा अर्ज आणि प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखलाही उच्च न्यायालयात सदर केला आहे. या दोन्ही कागदपत्रांमध्ये वानखेडे हे मुस्लिम असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मलिक यांच्या वकिलांनी न्यायाधीश माधव जमादार यांच्यासमोर हे म्हणणे मांडले. यावर आज दुपारी 2.15 वाजता सुनावणी होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com