समीर वानखेडेंनी विशेष NDPS कोर्टात स्वत: दिली साक्ष; चौकशीली सामोरे जायला तयार

आर्यन खान प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर आहे. ड्रग्स पार्टीवरुन ते प्रकरण आता समीर वानखेडे आणि राज्य सरकार यांच्या भोवती घुमू लागले आहे.
समीर वानखेडेंनी विशेष NDPS कोर्टात स्वत: दिली साक्ष; चौकशीली सामोरे जायला तयार
समीर वानखेडेंनी विशेष NDPS कोर्टात स्वत: दिली साक्ष; चौकशीली सामोरे जायला तयारSaam Tv

वैदेही काणेकर

मुंबई : आर्यन खान प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर आहे. ड्रग्स पार्टीवरुन ते प्रकरण आता समीर वानखेडे आणि राज्य सरकार यांच्या भोवती घुमू लागले आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात जो प्रकार सुरू आहे. त्याबाबत आता एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे Sameer Wankhede यांनी मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. न्यायाधीश वैभव पाटील यांच्या विशेष एनडीपीएस कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या गुन्ह्याबाबत समाज माध्यमावर सतत चर्चा सुरू आहे. अनेक पंचांची नाव उघड होत आहेत तसेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होत आहेत.

हे देखील पहा-

याप्रकरणी आता NCB आणि समीर वानखेडे यांनी वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. वानखेडेंनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिली आहे. समीर वानखेडे स्वत: कोर्टाला काही माहिती देण्यासाठी साक्षीदाराच्या पिंज-यात उभे राहीले आहेत. तर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार, मला वैयक्तिकरित्या काही जणांकडनं लक्ष्य केलं जातंय. माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवर सतत आरोप केले जात आहेत. आजही माझे काही खाजगी फोटो लिक करण्यात आलेत. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही चुकीचा वागलेलो नाही माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे. अशी समीर वानखेडेंची कोर्टापुढे साक्ष दिली आहे.

समीर वानखेडेंनी विशेष NDPS कोर्टात स्वत: दिली साक्ष; चौकशीली सामोरे जायला तयार
मलिकांच्या आरोपानंतर वानखेडेंचं स्पष्टीकरण; 'माझ्या मूळ गावी जा आणि तपासा'

मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे हे उद्या दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. समीर वानखेडे चौकशीसाठी दिल्लीला जाणार आहेत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com