आर्यन खान प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या समीर वानखेडेंची पुन्हा बदली

आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात चुकीचा तपास केल्याचा ठपका समीर वानखेडेंवर ठेवण्यात आला आहे.
sameer wankhede transfer News Latest Update
sameer wankhede transfer News Latest Update SAAM TV

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानशी संबंधित मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले एनसीबीचे (NCB) मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मोठा झटका मिळाला आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची बदली आता चेन्नईच्या डीजी टॅक्सपेअर सर्व्हिस डायरेक्टरेट (DGTS) येथे करण्यात आली आहे. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे आणि एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

sameer wankhede transfer News Latest Update
Sameer Wankhede: आर्यन खानला क्लीन चिट; समीर वानखेडे म्हणाले, 'माफ करा...'

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे एनसीबीचे मुंबईतील विभागीय संचालक म्हणून कार्यरत होते. सध्या ते डायरेक्टरेट ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्समध्ये आहेत. समीर वानखेडेंची बदली आता चेन्नईत डीजीटीएसमध्ये करण्यात आली आहे. आर्यन खानशी (Aryan Khan) संबंधित ड्रग्ज प्रकरणात चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले होते. त्यांची ही बदली याच कारवाईचा भाग असल्याचे मानले जात आहे.

sameer wankhede transfer News Latest Update
वानखडे यांना धक्का; आर्यन खान प्रकरणात NCB च्या तपासावर हायकोर्टाचे प्रश्नचिन्ह!

दरम्यान, एनसीबीने आर्यन खानशी संबंधित कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज (Cordelia cruise drug case) प्रकरणात गेल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल केले होते. एनसीबीकडून कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अन्य तीन आरोपींची नावे नव्हती. ठोस पुराव्यांअभावी एनसीबीकडून आर्यन खान याच्यासह इतर आरोपींविरोधात कोणतेही आरोप लावण्यात आले नव्हते. एनसीबीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे आणि एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तसेच या प्रकरणाचा चुकीचा तपास केल्याचा ठपका समीर वानखेडेंवर ठेवण्यात आला होता. त्यानंतर केंद्र सरकारने वानखेडेंवर कारवाईचे आदेश दिले होते. त्याच्या काही तासांतच समीर वानखेडेंची चेन्नईला बदली करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com