समीर वानखेडेंच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्विकारला होता, बोगस पद्धतीने नोकरी मिळवली - नवाब मलिक

समीर वानखेडेंच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्विकारला होता. बोगस पद्धतीने त्यांनी नोकरी मिळवली, त्यामुळे मागासवर्गीयावर अन्याय झाला असा दावा मलिक यांनी केला आहे.
समीर वानखेडेंच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्विकारला होता, बोगस पद्धतीने नोकरी मिळवली - नवाब मलिक
समीर वानखेडेंच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्विकारला होता, बोगस पद्धतीने नोकरी मिळवली - नवाब मलिकSaam Tv News

मुंबई: २ ऑक्टोबर आर्यन खान अटक प्रकरणापासून सुरु झालेला नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात संघर्ष सुरु झाला. दिवसेंदिवस हा संघर्ष टोकाला जात असून दररोज या प्रकरणात अनेक गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा नवीन आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांचा वडिलांचं नाव दाऊद असून मी शेयर केलेले त्यांचे जन्म प्रमाणपत्र खरे असल्याचा दावा केला आहे. सोबतच वानखेडेंच्या वडिलांनी चुकीच्या पद्धतीने नोकरी आणि पेंन्शन मिळवली ते पैसे सुद्धा त्यांना परत द्यावे लागतील आणि त्यांच्यावरही कारवाई होईल. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्विकारला असा दावाही त्यांनी केला आहे. (Sameer Wankhede's father converted to Islam, got a job in a bogus way - Nawab Malik)

हे देखील पहा -

आपल्या पत्रकार परिषदेत अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नते नवाब मलिक यांनी वारंवार समीर वानखेडेंचा उल्लेख ''समीर दाऊद वानखेडे'' असा केला आहे. सोबतच अनेक गंभीर आरोप केले आहेत. मलिक म्हणाले की, एनसीबी कार्यालयातील एक कर्मचाऱ्याने वानखडेंची केली पोलखोल केली आहे. मागील दोन दिवसांपासून एनसीबी झोनल संचालक समीर वनखेडेंबाबत बरीच माहिती समोर आलीय. आमची लढाई ही एनसीबी विरोधात नाही, एनसीबीने गेल्या ३५ वर्षांत चांगलं काम केलं आहे, कधी कोणी प्रश्न उपस्थित केले नाही. पण एक घाणेरडा मासा पुर्णा तलावाला दुषित करतो. एनसीबीने वानखेडेंची चौकशी सुरु केली आहे ही चांगली गोष्ट आहे. परभणीत मी होतो, ६ तारखेपासून बरेच प्रश्न मी मांडले. पण एका व्यक्तीने खोटे कागदपत्र देऊन नोकरी मिळवली आहे. ते पती, पत्नी, बाप, बहीणीला प्रकरणात गोवलं जात असल्याचा आरोप केला, पण आम्ही तस काही केलं नाही. मी हिंदू-मुस्लिम समाज मुद्दा पुढे केलेला नाही. भाजपने जातीय रंग दिला आहे. मी ४५ वर्षांपासून राजकारणात आहे, जातीयवाद आणला नाही. जी व्यक्ती खोटे कागद पत्र देऊन शेड्युल कास्टच्या कोट्यातून जागा मिळतोय, जिथे ज्याला खरंच गरज आहे, त्याची जागा स्वतः घेतली.

बोगस सर्टिफिकेटवरुन मिळवली नोकरी

मी ट्विट केलेलं जन्म प्रमाणपत्र खरं आहे. दाऊद वानखडे असं नाव आहे. मुंबईत जन्म प्रमापत्र ऑनलाईन मिळवता येते, ज्ञानेश्ववर वानखडे दलित आहेत, त्याच आधारावर त्यांनी नोकरी मिळवली, दाऊद खान नंतर बनले. पूर्ण परिवार ते मुसलमान म्हणून जगलेत. मी माझ्या बोलण्यावर कायम आहे. बोगस सर्टिफिकेट तयार करून नोकरी मिळवलीय. केंद्र सरकारकडे याची शहानिशा करण्याची कोणतीही यंत्रणा नाही. ते प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यलयातून मिळते, वानखडे यांनी देखील तसंच मिळवलेलं आहे. या सर्टिफिकेट वर दलित लोक तक्रार करणार आहेत, जिल्हा अधिकारी कार्यालयात ही तक्रार दाखल करणार आहेत, कारण त्यांचा हक्क कोणी इतराने घेतलाय. खोटे कागदपत्र बनवल्यामुळे वानखेडेंना ७ वर्षाची शिक्षा होऊ शकते, सरकारी पत्र कोणी नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी तसं होत नाही, ते समोर येतं असा दावा मलिकांनी केला आहे.

२६ प्रकरणे संशयास्पद

समीर वानखेडेंनी हाताळलेल्या काही प्रकरणांपैकी २६ प्रकरणे ही संशयास्पद असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.ते म्हणाले की, मला एक पत्र एका NCB च्या अधिकाऱ्याने पाठवलंय, दोन दिवसांपूर्वी ते पत्र आलंय. नाव न छापता पत्र पाठवलंय. मुख्यमंत्री आणि इतरांनाही ते पत्र गेलंय. हे पत्र NCB ने चौकशी सुरू केलीय, त्यासाठी हे उपयोगी पडेल. या पत्रात २६ प्रकरणांचा उल्लेख आहे. काही विशेष अधिकाऱ्यांचा फरजी प्रकरणे आणि पैसे वसुलण्याची माहिती आहे. पोलीस, फिल्म प्रकरण आणि इतर अश्या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.

मालदीवमध्ये वसुली झाली

आम्ही मालदीव आणि दुबई दोन्ही ठिकाणच्या वसुलींबद्दल म्हटलंय. १००० कोटींच्यावर वसुली झालीय. प्रभाकर सालीन याने सांगितलं १० कागदांवर सह्या घेतल्या. तसंच मला ५० एक कागदांवर सह्या द्यायला सांगितल्या असं देखील एका घाबरलेल्या व्यक्तीने सांगितलंय, मला या पत्रात माहिती दिली जातेय, ती आतली माहिती आहे त्यामुळे पुष्टी मिळतेय असा दावा मलिकांनी केला आहे.

मी कोणाच्या धर्मा वर बोलत नाही, पण खोट्या कागदपत्रांवर मी बोलतोय. माझ्याकडे अजून खूप पुरावे आहेत, ज्यावर कोणी नकार देऊ शकत नाही, येणाऱ्या काळात मी हे बाहेर काढेन. इस्लामिक पद्धतीने डॉ. सबाना शेख यांच्या समीर यांचं लग्न झालंय. त्यांच्या परिवाराबाबत मी विषय काढत नाहीत पण त्यांनी मागस्वर्गीयांच सर्टिफिकेट काढून जागा मिळवली आहे असा आरोप मलिकांना केला आहे.

समीर वानखेडेंच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्विकारला होता, बोगस पद्धतीने नोकरी मिळवली - नवाब मलिक
फरार किरण गोसावीची अटक करण्यासाठी पुणे पोलीस लखनऊला रवाना

फोन टॅपिंग होतेय

समीर दाऊद वानखडे मुंबईतील एक आणि ठाण्यातील एका व्यक्ती अश्या दोघांच्या माध्यमातून फोन टॅपिंग करतायत. नवाब मलिक कोणाच्या निजी जीवनात जात नाही, पण हे खासगी आयुष्यत जातात. समीर वानखडेंनी मुंबई पोलिसांना नवाब मलिकच्या मुलीच्या फोन टॅपिंगसाठी सांगितलं होतं, पण पोलिसांनी नकार दिला होता. ती काही क्रिमिनल नाही, खासगी आयुष्यात ते जातायत. समीर वानखेडे यांनी हजारो कोटींची वसुली केली आहे. मंत्री असताना आम्हाला इतका त्रास तर सर्व सामान्य व्यक्तींना किती त्रास दिला असेल. याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना भेटणार आहे. माझ्या ऑफिस ॉमध्ये मला धमकीचे फोन आले याबाबत गृहमंत्री यांना सांगण्यात आले आहे अशी माहिती मलिकांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com