संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम; सुनावणी पुढे ढकलली

आजच्या कोर्टाच्या निर्णयाने मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
sandeep deshpande and santosh dhuri pre arrest bail was not immediately granted the hearing on the application was postponed
sandeep deshpande and santosh dhuri pre arrest bail was not immediately granted the hearing on the application was postponed Saam Tv

मुंबई : मनसेनं राज्यात मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलन पुकारलं होतं. त्यावेळी पोलिसांनी अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवल्या होत्या. मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडेसहित अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्या होत्या. त्यादिवशी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली होती. याच आंदोलनाच्या दिवशी मनसे नेते संदीप देशपांडे,(Sandeep Deshpande) संतोष धुरी (Santosh Dhuri) यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात होते, त्यावेळी दोन्ही नेत्यांनी वाहनानं पळ काढला. त्यावेळी त्यांच्या वाहनाच्या धक्क्यानं एक महिला पोलीस जखमी झाली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. सदर घटना ४ मे रोजी राज ठाकरे यांच्या घराबाहेर घडली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी कोर्टात धाव घेतली होती. आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाव सुनावणी होती. मात्र, त्यांना आज कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. त्यांची अर्जावर पुढील सुनावणी १९ मे रोजी होईल. आजच्या कोर्टाच्या निर्णयाने मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

हे देखील पाहा -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी मशिदीवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली. ठाकरे यांनी मुंबई आणि औरंगाबादमधील भरसभेत भोंग्याच्या आवाजाविरोधात टोकाची भूमिका घेतली. भोंगे उतरवले गेले नाही तर त्याच्यासमोर लाऊडस्पीकर वर हनुमान चालीसा वाजवणार असे जाहीर केले होते. राज यांच्या भूमिकेनंतर मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. या भोंग्याच्या विरोधात मनसेनं ४ मे रोजी आंदोलन पुकारलं होतं. दुसरीकडे पोलिसांनीही मनसे कार्यकर्त्यांना धरपकड करण्याची मोहीम सुरू केली होती. अनेक कार्यकर्त्यांना अटकही केली होती. आंदोलनाच्या दिवशी पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पोलिसांना चकवा देत वाहनाने पळ काढला. यावेळी वाहनानं पळताना त्यांच्या वाहनाच्या धक्क्यानं महिला पोलीस जखमी झाली. तसेच सदर प्रकरणातील वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, दोन्ही नेत्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता. आज त्या अर्जावर सुनावणी होती. कोर्टात संदीप देशपांडे यांच्या बाजूने अॅड. सुजित जगताप युक्तीवाद करत होते. या सुनावणीवेळी कोर्टात स्थानिक पोलीस उपायुक्त प्रणय अशोक देखील उपस्थित होते.

sandeep deshpande and santosh dhuri pre arrest bail was not immediately granted the hearing on the application was postponed
जगभरामध्ये हवामान बदलाचे परिणाम; 2030 पर्यंत 9 कोटी लोकांवर उपासमारीचं संकट?

कोर्टात काय झाला युक्तीवाद ?

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटक पूर्व जामीन प्रकरणावर कोर्टात सुनावणी होती. अॅड. सुजित जगताप हे देशपांडे यांच्या बाजूनं युक्तीवाद करत होते. देशपांडे आणि धुरी अटकपूर्व जामीन अर्जाला यांच्या सरकारी वकिलांनी विरोध केला. दोघेही माजी नगरसेवक तथा राजकीय नेते आहेत. त्यांना जामीन दिल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. असा युक्तीवाद करत सरकारी वकिलांकडून अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. सरकारी वकील प्रदीप घरत युक्तीवाद करताना म्हणाले, घटनेवेळी गाडीचा दरवाजा उघडा आहे हे न पाहताच गाडी चालवण्यात आली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यादरम्यान झालेल्या पळापळीत महिला पोलिस जखमी झाली. यावेळी गाडीचे एक चाक पोलीस अधिकाऱ्याच्या पायावरून गेले. त्यामुळे अधिकाऱ्यांची संतोष धुरी यांच्यावरील पकड सैल झाली. त्यावेळी धावत्या गाडीचा उघडा दरवाजा सदर महिला पोलीसाला लागला आणि ती जमिनीवर कोसळली. या अपघातात महिलेच्या पाठीला जखमी झाली. काही अंतरावर आरोपींनी गाडी बदली केली. आणि ते नवी मुंबईच्या दिशेने गेल्याची माहिती घरत यांनी मुंबई सत्र न्यायालयात दिली.

पुढे घरत युक्तीवाद करताना म्हणाले, ' पोलीस त्यांचा वेळोवेळी शोध घेत आहे. दोन्ही नेते संपूर्ण गुन्ह्यातील महत्वाचे आरोपी आहेत. यात अन्य जणांचाही सहभाग भविष्यात समोर येऊ शकतो. दोन्ही आरोपी हे पोलिसांना सहकार्य करत नाहीत. या दोघांना कोठडी मिळणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळं यांचा जामीन मंजूर करू नये. या पूर्वीही संदीप यांच्यावर ११ गुन्हयांची नोंद आहे. याचाही न्यायालयाने विचार करावा, असा युक्तीवाद घरत यांनी केला. त्यानंतर कोर्टानं सदर अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी १९ मे रोजी ढकलली आहे. तसेच सदर प्रकरणातील अन्य दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज कोर्टात संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळं दोन्ही नेत्यांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com