संदीप देशपांडे, धुरी अद्यापही फरार; पोलिसांनी चालकाला घेतलं ताब्यात

सध्या संदीप देशपांडे व संतोष धुरी यांचा शोध सुरू
संदीप देशपांडे, धुरी अद्यापही फरार; पोलिसांनी चालकाला घेतलं ताब्यात
Sandeep Deshpande Latest Marathi NewsSaam Tv

मुंबई - मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या चालकाला मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतलं आहे. मुंबईत मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeary) यांच्या घरासमोरुन संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना पोलीस ताब्यात घेत असताना देशपांडे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत त्यांच्यासोबत असलेले संतोष धुरी यांच्या धक्क्यामुळे मुंबई पोलीस दलातील एक महिला कॉन्स्टेबल खाली पडल्या. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी सध्या फरार आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. सध्या संदीप देशपांडे व संतोष धुरी यांचा शोध सुरू आहे.

हे देखील पाहा -

नेमकं काय घडलं होतं?

संदीप देशपांडे, संतोष साळी आणि संतोष धुरी शिवतीर्थावर दाखल झाले होते. यानंतर माध्यमांना प्रतिक्रया देत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या धडपडीत एका महिला पोलीस कॉन्स्टेबल मनसे नेते संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांना अडवत असताना संतोष धुरी यांनी महिला कॉन्स्टेबलला धक्का दिला, त्यामुळे त्या जमिनीवर पडल्या. अशात माध्यमकर्मींच्या गर्दीचा फायदा घेत संदीप देशपांडेंनी यातून पलायन केले. या दोन्ही नेत्यांनी पळ काढल्यानंतर पोलिसांनी इतर उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Sandeep Deshpande Latest Marathi News
आजपासून भाविकांसाठी केदारनाथ मंदिर खुले; पहाटेपासूनच दर्शनासाठी हजारोंची गर्दी

संदीप देशपांडे कालपासून मंध्यमांच्या समोर येत नव्हते. मात्र आज संदीप देशपांडे, संतोष धुरी संतोष साळी हे अचानक शिवतीर्थ बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता देशपांडे आणि धुरी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेले. मात्र यादरम्यान महिला पोलिसासोबत घडलेल्या घटनेमुळे देशपांडेंच्या अडचणींत वाढ होणार आहे. ४ मे नंतर जर मशिदींवरील भोंग्यावर सरकारकडून कारवाई झाली नाही, तर आपण मशिंदीसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचं मनेसकडून सांगण्यात आलं होत. आज मनसेने दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपली असल्याने काही ठिकाणी मनसैनिक (MNS) आक्रमक झाले होते. लाऊडस्पीकर्सचा वापर करत मनसेकडून हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं. शिवाय मशिद परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामची घोषणाबाजी देखील करण्यात आल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.