संजय राऊतांची ईडीकडून कसून चौकशी; माध्यमांशी बोलताना म्हणाले...

चौकशी संपल्यानंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मी ईडीला संपूर्ण सहकार्य केलं असल्याचं राऊतांनी सांगितलं.
Sanjay Raut
Sanjay Raut saam Tv

सूरज सावंत

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज (शुक्रवारी) अंमलबजावणी संचालनालयासमोर (ED) हजर झाले. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यामुळे आज संजय राऊत हे पांढरा शर्ट आणि गळ्यात भगव्या रंगाचा स्कार्फ (कपडा) गुंडाळून ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर आज ईडीने संजय राऊत यांची तब्बल ९ तास चौकशी केली. चौकशी संपल्यानंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मी ईडीला संपूर्ण सहकार्य केलं असल्याचं राऊतांनी सांगितलं. ( Sanjay Raut News In Marathi )

Sanjay Raut
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर म्हणाले, एकही आमदार मंत्री होणार नाही, तरीही..."

आज दुपारी १२ वाजता राऊतांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. राऊत हे सकाळी साडेअकरा वाजताच ईडी कार्यालयाजवळ पोहोचले. ईडी चौकशीला सामोरे जाण्याआधी ईडी कार्यालयाबाहेर राऊतांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नाना उत्तरं दिली. त्यानंतर ईडी कार्यालयात गेले. ईडी कार्यालयात गेल्यानंतर तब्बल त्यांची पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ९ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर राऊत हे ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. 'मी ईडीला संपूर्ण सहकार्य केल. त्यांना जी माहिती हवी होती, ती माहिती दिली आहे. काही माहितीची गरज लागल्यास पुन्हा यायला तयार असल्याचे ईडी कार्यालयाला सांगितले', असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

Sanjay Raut
केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्यानेच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं : देवेंद्र फडणवीस

दरम्यान, संजय राऊत यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याबाबत याआधी समन्स पाठविण्यात आले होते. त्यावेळी ते उपस्थित न राहता, त्यांचे वकील न्यायालयात गेले होते. त्यांनी यावेळी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, ईडीने १ जुलैचे समन्स पाठवले होते. त्यानुसार आज, शुक्रवारी दुपारी १२ वाजता संजय राऊतांची ईडी चौकशी कार्यालयात हजर झाले. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी राऊतांना ईडीची समन्स जारी करण्यात आले होते. काल, गुरूवारी संजय राऊतांनी आपण कोणत्याही कारवाईला सामोरं जाण्यास तयार असल्याचं म्हटले होते. त्यानुसार राऊत आज ईडी कार्यालयात हजर राहून ईडी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या चौकशीला सामोरे गेले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com