
रश्मी पुराणिक
मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज शरद पवार यांच्या निवासस्थानी आले होते. आंदोलकांनी शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील भेटीनंतर राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षभाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच गुणरत्न सदावर्तेंना भाजपचे पाठबळ आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गरळ ओकण्यासाठी पैसा केला जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
हा दळभद्रीपणाचा कळस;
संजय राऊत म्हणाले, कालची घटना हे आंदोलन नसून तो हल्ला होता. त्या हल्लीचे समर्थन राज्यातले विरोधी पक्ष करत आहेत. हे समर्थन हा दळभद्रीपणाचा कळस आहे. अश्या प्रकारे तुम्हाला सरकारला अडचणीत आणता येणार नाही. तुमची बेअब्रू होतेय हे तुम्ही लक्षात घ्या. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर ज्यांचं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संसदीय लोकशाही पद्धतीत विकासात, शेती क्षेत्रात प्रचंड योगदान आहे. अश्या नेत्यावर महाराष्ट्रातच आपल्या लोकांना तुम्ही हल्ला करायला लावता, हे पाप तुम्ही कुठे फेडाल? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. (Sanjay Raut Live)
गुणरत्न सदावर्तेंवर राऊतांचा गंभीर आरोप
राऊत म्हणाले, हा जो कोणी भारतीय जनता पक्षाचा नवनिर्माण केलेला नेता आहे, गुणरत्न सदावर्ते त्याला भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण पाठबळ आहे. तो कुठे राहतो? कुणाच्या घरात राहतोय? त्याला आर्थिक पाठबळ कोणाचं आहे? आणि त्याला फक्त महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याविरुद्ध गरळ ओकण्यासाठी अर्थ पुरवठा केला जातो. कालचा हल्ला हा त्यातलाच भाग होता. हे मी स्वतः पाहिलं आणि ते सिद्ध झाले आहे, असे राऊत म्हणाले. (Sanjay Raut Allegation on Gunratna Sadavarte)
पहा व्हिडीओ-
'सर्व आंदोलकांकडे प्लॅटफॉर्म तिकीट कसे?'
जे आंदोलक रेल्वे स्टेशनला बसले आहेत, त्या सगळ्यांकडे प्लॅटफॉर्म तिकीट कसे असू शकतं? कोणता राजकीय पक्ष त्यांना पोसतोय? आम्हाला कामगारांची सहानुभूती आहे. कामगारांच्या श्रमातून महाराष्ट्र निर्माण झाला आहे. पण जे कामगारांचा एक गटाला भडकवून ज्याप्रमाणे सरकारविरुद्ध जे काय हल्ले करण्याचा प्रयत्न सुरूआहे त्यावरून विरोधी पक्षाला वाटत असेल ते फार मोठी तिरंदाजी करत आहेत. तर ते भ्रमात आहेत, अस राऊत म्हणले.
'कालपर्यंत राष्ट्रवादीमध्ये असणारे आज शरद पवारांविरोधात बोलतात'
ज्याप्रमाणे काल काही विरोधी पक्ष नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते मी पाहिलं. ते कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत का ? ते सर्व कालपर्यंत राष्ट्रवादीमध्ये होते आणि नंतर भाजपमध्ये गेले आहेत. ते शरद पवार यांच्या विरोधात बोलत होते. ते हल्ल्याचे समर्थन करत होते. हा हलकट्पणा आहे. ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, तुम्ही काय मूळचे भाजपचे आहात का? गुळगुळीत सत्ताकारण आज चालत नाही, असा प्रश्न संजय राऊतांनी यावेळी विचारला.
'तुमचीही घरं काचेची आहे हे लक्षात ठेवा';
दरम्यान, आज सकाळी पवार यांच्या घरावरील आंदोलनाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांनी काल (८ एप्रिल) काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरासमोर एकत्र येत अतिशय तीव्र आंदोलन केले. विलीनाकरणाच्या मुद्द्यावरुन न्यायालयाने निर्णय दिला असतानाही कर्मचारी (ST Workers) अतिशय आक्रमक झाले होते. याबाबत आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचं नाव न घेता भाजपला (BJP) टोला लगावला आहे. काही लोग अचानक नेते झाले आहेत आणि एक राजकीय पक्ष त्यांना विशेष ताकद देतोय, हे ठिक नाही. तुम्हीही काचेच्या घरात राहतात हे लक्षात ठेवा असा इशारा राऊतांनी दिला होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.