'ही जनतेची फसवणूक, संविधानाचा अपमान'; संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला टोला

...आणि आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार?
'ही जनतेची फसवणूक, संविधानाचा अपमान'; संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला टोला
Sanjay raut

मुंबई: महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे. प्रत्येक कारवाई कायद्याने होते, असे म्हणत संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, यावेळी बोलताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपवर देखील निशाणा साधला आहे. जर कोणी लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाच्या मदतीने अशी कारस्थानं करत असेल, तर त्यांच्यावर नक्कीच राजद्रोहाचा खटला दाखल होत असतो, असे ते यावेळी म्हणाले. तसेच, पुढे बोलत असताना मुंबईबरोबरच (Mumbai) महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक घडवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. मग ते सदावर्ते असू, किंवा राणा दाम्पत्य असू दे, यामागे भाजप (BJP)आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

हे देखील पहा-

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, हा न्यायालयाचा (court) निर्णय आहे. याच्याशी सरकारचा काही संबंध नाही. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे. इथे प्रत्येक कारवाई कायद्याने होत आहे. काल किंवा अलिकडच्या काळात पोलिसांनी (police) जे चित्र बघितलं आहे. राणा दाम्पत्याच्या माध्यमातून मुंबईबरोबरच महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक घडवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. मग ते सदावर्ते असतील किंवा राणा दाम्पत्य असतील, यामागे भाजप आहे. हे खूप मोठे षडयंत्र आहे, कारस्थान आहे. त्यांच्यावर पोलिसांनी लावलेली कलम योग्य आहेत असे मला वाटते. अशा प्रकारे राज्य उठवण्याचा कट धर्माच्या नावावर महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) नाही, तर कुठे देखील होऊ नये. पश्चिम बंगाल असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा अन्य राज्य असू दे, अशाप्रकारे जर कोणी लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाच्या मदतीने अशी कारस्थाने करत असतील, तर त्यांच्यावर नक्कीच राजद्रोहाचा खटला दाखल होत असतो. हे काही आज होत नाही.

भीमा- कोरेगावमध्ये अनेक विचारवंत, लेखक, कवी यांना अटक करुन राज्य उठल्याचा कट त्यांच्यावर मागच्या सरकारने लावला आहे. यामुळे त्यांनी आता आम्हाला शिकवू नये. हे मोठे षडयंत्र आहे. सदावर्ते प्रकरणामध्ये हेच झाले आहे. राज्य उठवायचे, राज्य अस्थिर करायचे. तिथे पवारसाहेबांच्या घरी ते गेले, इथे मातोश्रीवर घुसण्याचा प्रयत्न ते करत होते. पोलीस आहेत त्यामुळे ठिक आहे, पण शिवसैनिक प्रतिकार करतात. मग संघर्ष निर्माण करायचा, यानंतर दंगल सदृश परिस्थिती निर्माण करायची. एकदा मनाप्रमाणे घडले की, राज्यपाल त्यांचेच आहेत. मग राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवटीची मागणी करायची, असा प्रकार सुरु आहे, असे संजय राऊत म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते असतील, हे सगळे हे राज्य सक्षमपणे पुढे नेत आहेत.

Sanjay raut
वादळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका!

यामुळे यांचा प्रत्येक कट उधळला जात आहे, असे म्हणत राऊतांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. पुढे बोलत असताना ते म्हणाले की, हनुमान चालिसाला महाराष्ट्रात विरोध आहे का? देशात कुठेच विरोध नाही. हनुमान चालिसाला कोणी विरोध केला? काल ते जेलमध्ये होते, तिथे वाचू शकतात. आता त्यांना कोणत्या तरी जेलमध्ये पाठवल आहे. तिथे त्यांनी वाचावी हनुमान चालिसा. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन वाचावी, एखादे मोठे सभागृह घ्यावे तिथे त्यांनी वाचावे. या महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक हिंदुंच्या कार्यक्रमाला कोणीच विरोध केला नाही. पण तुमचा जो हट्ट आहे, मी मातोश्रीत घुसून वाचणार, तुम्ही घुसून वाचणार मग आम्हीही घुसू. तुमच्या बापाचं राज्य आहे का?", असं संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com