'हिंदू पळपुटा नाही हे बाळासाहेब ठाकरेंनी देशाला दाखवून दिलं'

मराठी माणसाच्या मनगटात बाळासाहेब ठाकरे यांनी चेतना जागवली.
'हिंदू पळपुटा नाही हे बाळासाहेब ठाकरेंनी देशाला दाखवून दिलं'
balasaheb thackeray

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक महान योध्दा होते. मराठी माणसासाठी आणि देशातील तमाम हिंदुंसाठी ते महानायक लढवय्या होते. त्यांचे स्मृती अखंड आमच्या मनात असतात, एक दिवसासाठी नसतात. आज संपुर्ण देश त्यांना अभिवादन करीत आहे. बाळासाहेब ठाकरे जर आज आपल्यात असते तर अनेक गोष्टींना आज ब्रेक लागला असता. त्या कुठल्या गोष्टी मी आत्ता सांगत नाही. राष्ट्रभक्तीचे, हिंदू विचाराचे तेज प्राप्त करुन दिले असे खासदार संजय राऊत यांनी नमूद केले. sanjay raut balasaheb thackeray devendra fadanvis mumbai

balasaheb thackeray
काेल्हापूर : पुन्हा पाटील विरुद्ध महाडीक पारंपारिक लढत रंगणार

हिंदू या यापुढे मार खाणार नाही, हे बळ या देशाला देण्याचे काम बाळासाहेबांनी केले. हिंदू पळपुटा नाही हे बाळासाहेबांनी देशाला दाखवून दिलं. महाराष्ट्रमध्ये मराठी माणूस ताठ मानेने जगेल त्यासाठी त्यांनी अखंड संघर्ष केला. मराठी माणसाच्या मनगटात त्यांनी चेतना जागवली की लढत रहा ही मुंबई आणि महाराष्ट्र तुझा आहे असे खासदार राऊत यांनी नमूद केले.

वेडी लाेकं बरळतात

कंगना राणावत यांच्या महात्मा गांधी विषयी यांच्या विधानावर राऊत म्हणाले वेडी लोकं बरळत असतात, ते का बरळतात कोणत्या नशेमध्ये असतात. त्यांना नशेचा पुरवठा कोण करीत आहे याचा तपास एनसीबीने करायला हवा.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com