अडीच अडीच वर्ष ही अफवा- संजय राऊत...(पहा व्हिडिओ)

2019 च्या विधानसभेच्या Assembly निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये मोठी उलथापालथ घडली.
अडीच अडीच वर्ष ही अफवा- संजय राऊत...(पहा व्हिडिओ)
अडीच अडीच वर्ष ही अफवा- संजय राऊत...(पहा व्हिडिओ) Saam Tv

मुंबई : 2019 च्या विधानसभेच्या Assembly निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये मोठी उलथापालथ घडली. शिवसेना Shiv Sena, राष्ट्रवादी काँग्रेस NCP आणि काँग्रेस Congress यांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. तेव्हापासून या सरकारचे नेतृत्वाला ५ वर्षे उद्धव ठाकरे करतील आणि सरकार हे ५ वर्षे टिकनार आहे. या सरकार मधील नेते सतत सांगत असतात.

पहा व्हिडिओ-

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या CM Uddhav Thackeray प्रकृतीच्या समस्या निर्माण झाल्यापासून अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चांना शिवसेना नेते आणि मविआ सरकारच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत Sanjay Raut यांनी पूर्णविराम दिला आहे. महाविकास आघाडी सरकारला २ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री बदलणार का? अशी विचारणा झाली असता संजय राऊत म्हणाले की, अशा पुड्या कोण सोडत आहे हे मला माहिती नाही.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. तेव्हापासून प्रक्रियेमधील मी महत्वाचा एक साक्षीदार आहे. तसेच एक क्रियाशील कार्यकर्ता देखील होतो. कुणाच्या डोक्यात ही कल्पना नव्हती. तेव्हा निकाल सुरू असताना मी शरद पवारांकडे जाऊन असे होऊ शकत असे सांगितले होते. तेव्हा काय चर्चा झाली हे मला माहिती आहे. तेव्हा शरद पवार यांनी राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे पूर्ण वेळ करणार असे स्पष्ट केले होते.

अडीच अडीच वर्ष ही अफवा- संजय राऊत...(पहा व्हिडिओ)
देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली; प्रजनन दर कमी झाला

या सरकारचा कालखंड ५ वर्षांचा आहे, त्याच्या मनात काही देखील शंका नाही, तसेच कुणीही किती ओढाताण केली तरी हे महाआघाडी सरकार पडणार नाही. जास्त आमदार म्हणून 2019 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. आता 2024 मध्ये हेच सूत्र कायम राहणार का? अशी विचारणा यावेळी करण्यात आली होती. यावर संजय राऊत यांनी ती शक्यता फेटाळून लावली आहे. ते म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये एकवेळ अशी आली होती.

यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जास्त होते. तरी देखील काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला. आमची कमिटमेंट ही ५ वर्षांची आहे. त्यानंतर निवडणुकीला सामोरे जाणार आहे. मात्र, मी नेहमी सांगतो की शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यामध्ये दीर्घकाळ काम करणार आहे. तसेच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा ५ वर्षांची टर्म पूर्ण करणार आहे. एवढेच नाही तर ते प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com