
मुंबई: मिसळ ही महाराष्ट्राची खाद्य संस्कृती असून त्यात झटका आहे. उद्या महाराष्ट्र दिन असून स्वाभिमानाचा झटका अनेकांना द्यावा लागणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिला. शिवसेना (Shivsena) व युवा सेनेतर्फे डोंबीवली सावळा राम क्रीडा संकुळावर मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस सूरु असलेल्या महोत्सवात कोल्हापूर, सांगली, पुणे, कल्याण नाशिक, ठाणे, पारनेर, कोकण मधून मिसळ स्टॉल धारकांनी सहभाग घेतला आहे.
मिसळ महोत्सवला पहिल्याच दिवसाची डोंबिवलीकरांनी मिसळ खायला चांगलीच गर्दी केली होती. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मिसळ महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी मिसळीचा आस्वाद देखील घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांचा इशारा दिला.
भाजपकडून नवहिंदू ओवेसींना शिवसेनेविरोधात लढवण्याचे काम: संजय राऊत
औरंगाबाद येथे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या होणाऱ्या सभेबाबत बोलताना राऊत म्हणाले, एक हिंदू ओवेसी आणि मुस्लिम ओवेसी दोन्ही महाराष्ट्रात आहेत. ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने एका ओवसीला उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी वापरण्यात आले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही नव हिंदू ओवेसीला शिवसेनेविरोधात (Shivsena) लढवून हिंदूंचे नुकसान करण्याचे काम भाजप करीत असल्याची जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.
तर सध्या महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, ज्याप्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे. ती मात्र आपली संस्कृती नाही. महाराष्ट्रात यापूर्वीही सत्ताधारी आणि विरोधक, विविध विचारांचे लोकं एकमेकांच्या भूमिकांना विरोध करत राहिले. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर किंवा पवारांनी बाळासाहेबांवर वेळोवेळी टिका केली. परंतु महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सुड, द्वेष आणि कमरेखाली वार करण्याचे राजकारण कधीच झाले नाही. भाजपने गेल्या २ - ४ वर्षांत सुरू केलेले राजकरण महाराष्ट्र आणि देशाला परवडणारे नसल्याचे मतंही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.