Sanjay Raut on Pm Modi
Sanjay Raut on Pm Modisaam tv

Sanjay Raut on Pm Modi: 'बिपरजॉय मोदी-शाहांना प्रकल्प वाटला, वळवला गुजरातकडे', संजय राऊतांचं विरोधकांना बोचणारं भाषण

Sanjay Raut Latest News: 'बिपरजॉय मोदी-शाहांना प्रकल्प वाटला, वळवला गुजरातकडे', संजय राऊतांचं विरोधकांना बोचणारं भाषण

Sanjay Raut Latest Speech: 'परवा वादळ आलं बिपरजॉय नावाचं. मोदींना वाटलं मोठा प्रकल्प आहे हा, म्हणून गुजरातकडे वळवला', असं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. मुंबईतील सरदार वल्लभाई पटेल संकुल (NSCI) वरळी येथे आयोजित राज्यव्यापी पदाधिकारी शिबिर 2023 येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य करत संजय राऊत म्हणाले आहेत की, ''क्रिकेटचं सर्वात सर्वात मोठं स्टेडियम अहमदाबादमध्ये केलं. कारण मुंबईमधील क्रिकेटचं महत्व कमी व्हावं. क्रिकेट हा मुंबई आणि महाराष्ट्राला रोजगार देणारा फार मोठा खेळ आहे. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट हे गुजरातमध्ये सरकवलं आहे.''

Sanjay Raut on Pm Modi
Aditya Thackeray News : शिंदे गटाचा उद्या जागतिक 'खोके दिन'; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

ते म्हणाले, ''परवा वादळ आलं बिपरजॉय नावाचं. त्यांना वाटलं बिपरजॉय नावाचा मोठा प्रकल्प इथं येत आहे, मोदी आणि शाह यांना वाटलं वळवला गुजरातकडे आणि केलं नुकसान.  (Latest Marathi News)

'त्या बाईला घाई फार होती मला माहिती आहे'

तत्पूर्वी मनिषा कायंदे यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, ''मला कोणीतरी सांगितलं आपल्याकडल्या एक बाई गेल्या, त्या बाईला घाई फार होती मला माहिती आहे. त्या आल्याही घाई घाईत आणि गेल्याही घाईत.''

Sanjay Raut on Pm Modi
Ashish Deshmukh News: कॉंग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांचा 'भाजप'मध्ये प्रवेश! पक्षप्रवेश होताच विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

'मोदी-शाह यांच्यासोबत वैयक्तिक भांडण नाही'

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ''मोदी-शाह यांच्यासोबत आमचं वैयक्तिक भांडण नाही. मात्र देशामध्ये जे सूडाचं राजकारण सुरु आहे, याचा बदला शिवसेना घेणार आहे. शिवसेनाही सूड उगवणार आहे. उद्या आमचं सरकार आलं तर मोदी-शाह हे सुद्धा शिवसेनेमध्ये दिसतील.''

ते म्हणाले, ''सत्ता आल्यानंतर ईडीच्या भीतीने देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेत येतील. त्यांना घ्यायचं की नाही, हे उद्धव ठाकरे ठरवतील. देशात ज्या राज्यामध्ये भाजपचं सरकार नाही, तेथील सरकारला त्रास दिला जातो.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com