त्यांचे हे असं वागणं म्हणजे काेराेनाला आमंत्रण : संजय राऊत

sanjay raut
sanjay raut
Summary

ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणेकर नागरिकांच्या सोयीसाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. त्याचा लाेकार्पण साेहळा आज पार पडला.

ठाणे : काेविड १९ च्या पार्श्वभुमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. आज महाराष्ट्रातील, ठाण्यातील सर्वांत माेठा उत्सव म्हणजे दहीहंडी dhai handi उत्सव. काेराेनाचे संकट पाहता यंदा उत्सव साजरा करु नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले परंतु तरीही काही राजकीय पक्षाचे लाेक हट्टाने विराेधासाठी विराेध म्हणून रस्त्यावर मला दहीहंडी साजरी करताना दिसले. हे काेराेनाला covid 19 आमंत्रण आहे असे खासदार संजय राऊत sanjay raut यांनी नमूद करीत म्हणून त्यांच्यासाठी हा ऑक्सिजन प्लांट आहे अशा कानपिचक्या दहीहंडी साजरी करणा-यांना दिल्या.

कोविड १९ चा प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गोकुळाष्टमीचा सण यंदा देखील साधेपणाने साजरा करत ‘आरोग्य उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत ठाण्यातील ‘संस्कृती प्रतिष्ठान’ यांच्या वतीने दहीहंडी dhai handi उत्सवाचे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ aarogya utsav आयोजित करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यातर्फे आज (मंगळवार) ठाणे शहरातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे आले. त्यापुर्वी खासदार संजय राऊत यांचे भाषण झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते.

संजय राऊत म्हणाले आज मला माध्यमांनी विचारले भाजप मंदिरे उघडा यासाठी आंदाेलन करीत आहे. या प्रश्नावर मी माध्यमांना सांगितले करु द्या आंदाेलन ज्यांना गर्दी जमवायाची आहे आणि रुग्णालयात जायचे आहे त्यांच्यासाठी मी आज एका ऑक्सिजनच्या प्लांटच्या उदघाटनासाठी जात आहे.

जे कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम पाळत नाहीत ते त्यांच्या संसर्गाला आमंत्रण देतात. रुग्ण वाढले की ऑक्सिजनची मागणी वाढते त्यावेळी अशा प्रकारच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची गरज भासते. कोरोना लढाईत ज्याप्रकारे काम ठाणेकरांनी काम केलं आहे ते मार्गदर्शक असल्याचे खासदार राऊत यांनी नमूद केले.

sanjay raut
बाेंबलून आशीर्वाद मिळत नाहीत; उद्धव ठाकरेंचा भाजपला टाेला

नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची सर्वांधिक गरज भासली. उत्पादनापेक्षा मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र जिल्हा नियोजन विकास निधी आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसरातील महापालिकांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे पीएसए प्लांट उभारले आहेत. त्यामाध्यमातून गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी मदत होईल. सध्या कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत असल्याचे सांगत संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन केले.

प्रारंभी आमदार प्रताप सरनाईक यांनी मनाेगत व्यक्त केले. ते म्हणाले ठाण्यातील विहंग पाम क्लब येथे कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. ठाण्यातील हा ऑक्सिजन प्लांट सुरु होत असून दिवस-रात्र या प्लांटमधून शहराला ऑक्सिजन सेवा मिळणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित ऑपरेटर, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. हवेतून ऑक्सिजन निर्माण करून त्याचे फिल्टरेशन करून ते सिलेंडरमध्ये भरले जाणार आहे. या प्लांटमधून १२० सिलेंडर ऑक्सिजन दिवसाला मिळणार आहे. हे ऑक्सिजन जनतेला विनामूल्य उपलब्ध होणार आहे.

sanjay raut
Tokyo Paralympics : नेमबाज सिंगराज अधानाने पटकाविले कास्य

हा ऑक्सिजन प्लांट लोकांसाठी २४ तास सुरु राहील. रिकामे सिलेंडर घेऊन येणाऱ्या नागरिकांना भरलेले ऑक्सिजन सिलेंडर येथून दिले जाईल. तसेच ज्यांच्याकडे सिलेंडर नसेल त्यांच्याकडून अनामत रक्कम घेऊन मोफत ऑक्सिजन सिलेंडर देण्यात येतील. दररोज निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पालिका, सरकारी हॉस्पिटल तसेच गरज पडल्यास खासगी रुग्णालयांना केला जाईल. काेविड १९ पूर्णपणे हद्दपार होईपर्यंत व त्यानंतरही ही ऑक्सिजन सेवा सुरु राहणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com