...तर तुम्हाला बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट पाठवतो; राऊतांचा राज ठाकरेंना टोला

'ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रा विरुद्ध कारस्थान केलं त्यांची जेल मद्ये जाण्याची वेळ आली आहे.'
...तर तुम्हाला बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट पाठवतो; राऊतांचा राज ठाकरेंना टोला
Sanjay Raut on Raj Thackeray, Sanjay Rau Latest Marathi NewsSaam TV

मुंबई : आंदोलन आहेच कुठे? महाराष्ट्रात भोंग्याच्या बाबतीत कुठेही कायद्याच्या प्रश्न निर्माण झालेरा नाही. कालच पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे की, ज्या मशिदींवरती भोंगे आहेत त्यांनी त्यांच्या परवानग्या घेतल्या आहेत. जर समान नागरी कायदा असावा असं वाटत असेल तर प्रत्येकानं न्यायालयाच्या कायद्यांचे पालन करायला हवं असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी बोलताना केलं आहे. (Sanjay Rau Latest Marathi News)

ते म्हणाले, कोणीतरी चिथावणी करत असेल आणि केंद्रातील पक्ष अशांना बळ देत असेल तर याची दखल केंद्राला घ्यावी लागेल. तसंच आंदोलनाचे सगळ्यात जास्त महत्व शिवसेनेला माहित आहे. आम्ही आंदोलने केली आहेत आणि ती आंदोलन कशी असावी हे शिवसेनेकडून (Shivsena) शिकावं असा टोलाही राऊतांनी मनसेला यावेळी लगावला. तसंच राज्यात ठाकरे सरकार आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यस्थेची दखल घेण्यास सक्षम असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे देखील पाहा -

दरम्यान, आज राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा भोंग्याच्या भुमिकेबाबतचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. या ट्विट बाबत त्यांना प्रश्न विचारला असता राऊत म्हाणाले, राज (Raj Thackeray) यांनी पुन्हा पुन्हा बाळासाहेब ठाकरेंच्या भुमिका तपासायला पाहिजेत बाळासाहेबांचा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे, बाळासाहेबांनी रस्त्यावरचे नमाज बंद केले, बेकायदेशीर भोंगे बंद केले तसंच तुम्हाला अजून काही बाळासाहेबांचा भाषणाच्या कॅसेट पाठवतो म्हणजे त्यांची भुमिका कळेल असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

शिवाय विरोधक म्हणतात सगळे भोंगे बंद करायचे तर मग गावातली भजन कीर्तन बंद करायची का? जरा डोकं ठिकाणावर ठेवा अशी तीव्र प्रतिक्रिया देखील राऊत यांनी दिली. नियमानुसार सरकार चाललं असेल तर ते चालू द्या; ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रात विरुद्ध कारस्थान केलं त्यांची जेल मद्ये जाण्याची वेळ आली आहे. तसंच बाळासाहेबांचे विचार सोडले ते भाजपचे उपवस्त्र वापरतात अशी टीका ही त्यांनी यावेळी केली.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.