...तर पेट्राेल ५० रुपयांनी कमी हाेईल; संजय राऊतांना विश्वास

त्यावेळी तुमचे काेट भांडीवालीला द्यावे लागतील असा टाेला राऊत यांनी शेलार यांना हाणला.
sanjay raut
sanjay raut

मुंबई : पेट्रोल डिझेलचे भाव केंद्र वाढवत आहे. भाजपचे हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री यांनी देखील केंद्राला दोष दिला आहे. केंद्राने पेट्रोल डिझेलच्या पैशातून बेहिशोबी कमावले. २५ ते ५० रुपयांनी कमी केले असते तर ठीक. त्यांना मनच नसल्याने कसलं आलयं मोठं मन असा टाेमणा आज (गुरुवार) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला हाणला. sanjay raut narendra modi petrol diesel price maharashtra

sanjay raut
अनिकेत जाधवची भारतीय संघात निवड; फुटबॉल पंढरीत जल्लाेष

राऊत म्हणाले दिवाळी साजरी करावी असे वातावरण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारने निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे ठीक आहे पण महागाईने मात्र वतावरण चांगले नाही. पेट्रोल डिझेलचे भाव कामी केले पण पाच आणि दहा रुपयांनी भागणार नाही. आत्ता पाेटनिवडणुकीत हरल्यानंतर इंधनाचे दर कमी केलेत. पेट्राेलचे भाव ५० रुपयांनी कमी करण्यासाठी भाजपला पूर्णपणे हरवावे लागणार असे राऊत यांनी दिवाळी नमूद केले.

राऊत म्हणाले माेठे मन असावं लागत. पाच रुपयांनी पेट्राेल कमी करणे म्हणजे मन माेठं झाले का? किमान २५ रुपये कमी झाले पाहिजे हाेते. शंभर रुपये वाढवायचे आणि पाच रुपये कमी करायचे हे यांचे माेठ मन असा टाेमणा राऊत यांनी लगावला.

राज्या बाहेरील एक निवडणुक जिंकल्याने सेना पंतप्रधान पदाचे स्वप्न पहात आहे असे सांगत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांनी काेट शिवला असेल अशी टिप्पणी केली आहे या प्रश्नावर राऊत म्हणाले मी कोट कधीच शिवत नाही कोट तुमचे लटकलेले आहेत. महाराष्ट्र बाहेर शिवसेनेने निवडणूक जिंकल्याचा आनंद आहे. केंद्रांतील भाजपच्या अनेकांनी तेथे प्रचार केला. स्वप्न केवळ तुम्ही पाहता का, आम्ही पण स्वप्न पाहतो आणि ती पुर्ण करण्याची क्षमता राखताे. केंद्रात २०२४ मध्ये पहाल तुम्ही. त्यावेळी तुमचे काेट भांडीवालीला द्यावे लागतील असा टाेला राऊत यांनी शेलार यांना हाणला.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com