देशातील यंत्रणांनी सुडबुद्धीने कारवाई करु नये : अजित पवार

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी काल ईडीने छापा टाकला.
Ajit pawar
Ajit pawar saam tv

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी काल ईडीने छापा टाकला. यानंतर रात्री उशीरा राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले. यानंतर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'बऱ्याच जणांना नोटीस आली, काही लोकांनी उत्तर दिली. काहींनी दिली नाही. राज्य आणि देशातील यंत्रणांनी सूड बुद्धीने किंवा सूड भावनेने कोणतीही कारवाई करता कामा नये, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी आज दिली.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ४ दिवसांचा दौरा करून आल्यानंतर उद्या मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून पत्र देणार आणि पत्रकार परिषद घेणार आहे. जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्यावर बोलताना पवार म्हणाले, केंद्रात सरकार असल्यावर राष्ट्रीय पातळीवर पक्ष टिकावा म्हणून अशी विधान करावी लागतात.

Ajit pawar
ITR : मुदत संपली, आता काय? १००० रुपये दंड देऊन भरू शकता आयटीआर, हे आहेत नियम

इतिहास बघता वेगवेगळ्या राज्यातील पक्ष पुढे येत असतात. काही वर्षांपूर्वी कुणी सांगितले होते का की आप हा पक्ष पुढे येईल . पण आता पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये पक्ष पुढे आला आहे. त्यामुळे त्यांना वाटून काही होत नसते जनतेच्या मनात जे येईल त्यानुसार होईल, असंही पवार (Ajit Pawar) म्हणाले.

संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली. फारच दुःखद आहे. ज्यांच्यावर कारवाई होते ते फारच अडचणीचं होते, घरदार उद्ध्वस्त होते, असंही पवार म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com