Exclusive: अडीच वर्षांचे मुख्यमंत्री ही तर 'पुडी'; संजय राऊतांची स्फोटक मुलाखत

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्तानं संजय राऊत यांनी साम टीव्हीला खास मुलाखत दिली आहे.
Exclusive: अडीच वर्षांचे मुख्यमंत्री ही तर 'पुडी'; संजय राऊतांची स्फोटक मुलाखत
Exclusive: अडीच वर्षांचे मुख्यमंत्री ही तर 'पुडी'; संजय राऊतांची स्पोटक मुलाखतSaam TV

पुणे : शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी साम टीव्हीला मुलाखत दिली आहे. उद्धव ठाकरे 5 वर्षांचे मुख्यमंत्री आहेत त्यातली अडीच वर्षे ही पुर्ण झाली आहेत. त्यामुळे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही नसेल असे संजय राऊत मुलाखती दरम्यान म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे हे अडीच वर्षांचे मुख्यमंत्री ही तर 'पुडी' आहे, आमची बांधिलकी 5 वर्षेच! असल्याचे राऊत म्हणाले. आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही नसल्याचंही राऊत म्हणाले. त्यांनी आणखीही काही विरोधकांना विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मुलाखती दरम्यान दिली आहेत. मुलाखती दरम्यान राऊतांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे, त्याचबरोबर अनेक प्रश्नांवर त्यांच्या शैलीत उत्तरं देखील दिली आहेत. ही मुलाखत तुम्ही आज संध्याकाळी साम टीव्हीवरती पाहू शकता. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्तानं संजय राऊत यांनी साम टीव्हीला खास मुलाखत दिली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये जर भाजपाची सत्ता आली तर मोदी सरकार पुन्हा कृषी कायदे लागू करेल.कृषी कायदे हे शेतकऱ्यांचे हिताचे नव्हते. ते काही मोजक्या उद्योगपतींच्या हिताचे होते. हे सरकार उद्योगपती चालवत आहेत. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी कंगना रानावत आणि तिच्या वक्तव्यावर देखील सडकून टीका केली आहे. कंगनाचा पद्म पुरस्कार मोदींनी मागे घ्यायला हवा होता असेही राऊत मुलाखती दरम्यान म्हणाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com