ही खंडणी नाही का?; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर नवा आरोप

हिसाब तो देना होगा, भाई! मी चॅरिटी कॉमर्स आणि एजन्सीकडे तक्रार दाखल केली आहे, असं राऊत म्हणाले.
ही खंडणी नाही का?; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर नवा आरोप
Sanjay Raut Saam TV

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत आणि भाजपचे (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. काही दिवसापूर्वी राऊत यांनी सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आयएनएस च्या नावाने पैसे गोळा करुन घोटाळा केला असल्याचा आरोप केला होता. आता एका पाठोपाठ दोन ट्विट करत संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे, तस भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन शिवसेनेच्या नेत्यांना धमकावत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. तर महाविकास आघाडी सरकारचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut : आत्ताचे पंतप्रधान हिटलर सारखे - संजय राऊत

'ही खंडणी नाही का? किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला कॉम्प्समधून करोडो रुपयांच्या देणग्या कशा मिळतात. ते ईडी, सीबीआय, आयटी, सेबीच्या रडारवर आहेत का? किंवा, काळा पैसा पांढरा करण्याचा हा खेळ आहे का? हिसाब तो देना होगा, भाई! मी चॅरिटी कॉमर्स आणि एजन्सीकडे तक्रार दाखल केली आहे, असं ट्विट संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.

एका पाठोपाठ दोन ट्विट करत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत. दुसऱ्या ट्विटमध्ये, अगोदर एखाद्या कंपनीला धमकवायचे आणि त्यांच्याकडून देणगी घ्यायची ही क्रोमालॉजी समजून घ्या, असं म्हटलं आहे.

किरीट का कमाल! 2013-14: किरीट यांनी एका कंपनीवर आरोप केले, 2018-19: युवक प्रतिष्ठानला खूप मोठी देणगी मिळाली. तुम्ही क्रोमालॉजी समजून घ्या! हे ED आणि EOW invstgatn चे प्रकरण नाही का?, मी लवकरच तक्रार दाखल करेन!, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.