गडबड हैं! सोमय्यांनी केला घोटाळा; राऊतांचं पुन्हा क्रोनोलॉजी सांगणारं ट्विट

सोमय्यांची युवक प्रतिष्ठाण काळा पैसा पांढरा करणारी संस्था असल्याचा आरोप राऊतांनी याआधीच केला आहे.
Sanjay Raut/kirit Somaiya
Sanjay Raut/kirit SomaiyaSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरुच आहे. राऊतांनी आज सकाळपासून किरीट सोमय्यांवर आरोप करण्यासाठी ट्विटचा धडाका लावला आहे. सोमय्यांची युवक प्रतिष्ठाण संस्था ही काळा पैसा पांढरा करणारी आहे असा आरोप राऊतांनी सोमय्यांवर केला होता. तसंच आपण फक्त सोमय्यांचे नव्हे तर, भाजपच्या (BJP) इतर नेत्यांचे घोटाळेही बाहेर काढणार असल्याचा इशारा राऊतांनी (Sanjay Raut) दिला होता.

अशातच राऊत यांनी आत आणखी एक ट्विट करत मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) यांनी २०१८-१९ मध्ये युवक प्रतिष्ठानला भरघोस देणग्या दिल्याबाबतचं ट्विट केलं आहे. त्यांनी या ट्विटमध्ये लिहलं आहे, किरीट सोमय्या यांनी ५६०० कोटीच्या NSELघोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. आता क्रोनोलॉजी समजून घ्या; किरीट सोमय्या खूप 'तमाशा' करतात, ईडीने मोतीलाल ओसवाल यांच्या कंपनीची चौकशी केली असून, याच मोतीलाल ओसवाल यांनी २०१८-१९ मध्ये युवक प्रतिष्ठानला भरघोस देणग्या दिल्या आहेत असं ट्विट करत राऊतांनी सोमय्यांना पुन्हा डिवचंलं आहे.

आज सकाळीच किरीट सोमय्या यांनी ५६०० कोटी NSELघोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी मोतीलाल ओसवाल या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून यासाठी खुद्द सोमय्या हे चौकशीसाठी कंपनीच्या शिपायाच्या घरी गेले, तिथे सोमय्यांनी तमाशा केला. त्यानंतर २०१८-१९ मध्ये त्यांना मोतीलाल ओसवालकडून त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी २ लाखांची देणगी मिळाली असा आरोप राऊत यांनी केला होता.

Sanjay Raut/kirit Somaiya
'किरीट का कमाल' म्हणत संजय राऊतांचा नवा 'बॉम्ब'; सोमय्यांवर गंभीर आरोप

एकीकडे संजय राऊत सतत सोमय्या 'बाप-बेटे जेल मे जाएंगे' चा नारा देत आहेत, तर आपण ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना तुरुंगात पाठविणार असल्याचा दावा सोमय्या करत आहेत. दरम्यान, सोमय्या यांचे युवक प्रतिष्ठाण हे काळा पैसा पांढरा करणारी संस्था असून मुंबईतील बड्या लोकांना ब्लॅकमेल करुन ही संस्था पैसे गोळा करत आहे. असा आरोप राऊत यांनी केला आहे. शिवाय सुरुवात किरीट सोमय्यांनी केलेली मात्र, शेवट आम्ही करणार आहोत, असा इशाराच राऊतांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com