Sanjay Raut On PM Modi : संजय राऊत यांचा राज्यातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल; म्हणाले, 'पंतप्रधानांना मुंबईत...'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर जोरादार टीकास्त्र सोडलं.
Sanjay Raut News
Sanjay Raut News Saam tv

निवृत्ती बाबर

Sanjay Raut News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर जोरादार टीकास्त्र सोडलं आहे. 'पंतप्रधानांना मुंबईत यावं लागतंय म्हणजे भाजपचं राज्यातील नेतृत्व कमकुवत आहे असा याचा अर्थ होतो, असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दोन वंदे भारत ट्रेन महाराष्ट्राला समर्पित केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर टीका केली.

Sanjay Raut News
PM Narendra Modi : वंदे भारत एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तिर्थक्षेत्राला चालना मिळेल : नरेंद्र मोदी

संजय राऊत म्हणाले, 'मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक त्यांच्या पक्षाने फार गांभीर्याने घेतल्या आहेत. पण देशासमोर वेगळे प्रश्न आहेत. संसदेत विरोधकांनी अदानीच्या खिशात एवढा पैसे कुठून आला याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. याचे उत्तर पंतप्रधान मोदी द्यायला तयार नाहीत, पण ते निवडणूक प्रचारात व्यग्र आहेत'.

'पंतप्रधानांना मुंबईत यावं लागतंय म्हणजे भाजपचं इथलं राज्याचं नेतृत्व कमकुवत आहे असा याचा अर्थ होतो. यापूर्वी कधी नव्हे इतके पैसे केंद्राकडून राज्याला मिळाले असं म्हणणं म्हणजे यापूर्वी केंद्र महाराष्ट्राला सूडबुद्धीने वागवत होते हे स्पष्ट होतं. असं करून त्यांनी महाराष्ट्राची वैर घेतलेलं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली आहे.

आगामी मुंबई महापालिकेवरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली. 'सरकार डबल इंजिनचा असो ट्रिपल किंवा चार इंजिनचं असो. अथवा हवेत उडणारं असो मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Sanjay Raut News
Chinchwad By-Election: महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं! राहुल कलाटेंची माघार नाहीच; पिंपरी चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार

पुण्यातील पोटनिवडणुकीवर संजय राऊत यांनी भाष्य केलं. 'राहुल कलाटे यांना शिवसेनेने उमेदवारीचा प्रस्ताव दिलेला नव्हता. कलाटे कुठल्या पक्षाकडून उमेदवारी घेणार होते हे मला माहीत नाही. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे हे मला तुमच्याकडूनच कळतंय. लोकशाहीत प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढण्याचा अधिकार असतो, असे संजय राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com