हा लाऊडस्पिकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेनेचे लाऊडस्पिकर ५६ वर्ष सुरू आहे सुरु राहणार, असंही संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut Shivsena Latest News
Sanjay Raut Shivsena Latest NewsANI

मुंबई: ज्यांनी महाराष्ट्रात चोऱ्या माऱ्या करुन सरकार स्थापन केले, त्यांना आता आदित्य ठाकरेंचा दौरा पाहून धडकी भरत आहे. राज्यातील हे सरकार आता टीकणार नाही. शिंदे-फडणवीस सरकार कलहाने पडेल. कोणाला काय करायचे आहे ते करुदे, आमचा लाऊडस्पीकर सुरूच राहणार, शिवसेनेचे (ShivSena) लाऊडस्पिकर ५६ वर्ष सुरू आहे. हा लाऊडस्पिकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका शिवसेना संजय राऊत यांनी भाजपवर केली.

उद्धव ठाकरे लवकरच बाहेर पडणार आहेत, त्यांचाही लाऊडस्पिकर सुरू होणार आहे. आमच्या लाऊडस्पिकरमुळे तुमचे कान बधीर होणार आहेत. आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टीकणार नाहीत, असा टोलाही राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

Sanjay Raut Shivsena Latest News
नीरज चोप्राने रचला इतिहास! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकावर कोरले नाव

आधी सरकार स्थापन करा. एक महिन्यामध्ये हम दोनो, एक दुजे के लिए याच स्क्रिप्टमध्ये अडकून पडला आहात. कितीवेळा दिल्लीला जाताय? किती वेळा? मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील. ठिक आहे. भाजपचे राज्य आहे. ते म्हणत असतील शिंदेगट शिवसेना आहे. पण नाही. शिवसेना काल पैठणला दिसली, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

हे सरकार चोऱ्यामोऱ्या करुन स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार पडणार आहे. टीकणार नाही. सध्या आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांचा हा दौरा पाहून अनेकांना धडकी बसली आहे.

Sanjay Raut Shivsena Latest News
Mumbai mega block : मुंबईत 'या' दोन दिवशी रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक!

काल पनवेल येथे भाजपची कार्यकारीणीची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, माझ्यावर कोणतीही कारवाई केली तरीही माझा लाऊडस्पिकर सुरूच राहणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com