'..तर त्यांना येरवड्यातील वेड्यांच्या हॉस्पिटलला न्यावे लागेल'

फडणवीस सध्या निराशेच्या गर्तेत आहेत असे संजय राऊत यांनी म्हटलं.
'..तर त्यांना येरवड्यातील वेड्यांच्या हॉस्पिटलला न्यावे लागेल'
sanjay raut devendra fadnavis

मुंबई : राज्यात कायद्याचे राज्य नूसन भ्रष्टाचाराचे राज्य असल्याचे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तसेच खासदार राऊत काय हाेते आणि काय झालेत अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. त्यावर माध्यमांशी बाेलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले काय तरी द्या वाल्यांचे राज्य गेल्यामुळे त्यांच्या वेदना मी समजू शकतो. sanjay raut on devendra-fadnavis comment uddhav thackeray maharashtra government

sanjay raut devendra fadnavis
दातृत्व; रिक्षाचालकास महिलेने दिली एक कोटी रुपयांची संपत्ती

राऊत म्हणाले अलीकडे ते खूप जुनी गाणी ऐकतात त्यांच्याकडे खूप वेळ आहे. आम्ही काय होतो हे आम्हांला माहिती आहे आणि तुम्ही काय होतात हे सर्व महाराष्ट्रला माहिती आहे. आणि जर ही अवस्था अशीच राहिली तर पुण्याच्या येरवडाच्या वेडांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल असा खाेचक टाेला राऊत यांनी फडणवीसांना लगावत असे होऊ नये यासाठी प्रार्थना करतो असे राऊत यांनी नमूद केले.

फडणवीस सध्या निराशेच्या गर्तेत आहेत. त्यांना गाेष्टी अर्जिण झाल्या की ताे बाेलतात असा टाेला ही राऊत यांनी हाणला. दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी खासदार संजय राऊत यांना जागवत ते एक महान याेद्धा हाेते असे म्हटलं.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com