"...म्हणून 3 काळे कायदे सरकारने वापस घेतले"-  संजय राऊत
"...म्हणून 3 काळे कायदे सरकारने वापस घेतले"- संजय राऊतSaam Tv News

"...म्हणून 3 काळे कायदे सरकारने वापस घेतले"- संजय राऊत

"निवडणुकीत फटका बसेल या भीतीने काळे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा"

मुंबई : शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा आज केली. मोदी आज देशवासीयांना संबोधित करत होते त्यावेळेस त्यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी या निर्णयाचे स्वागत करत मोदी सरकारवर वर निशाणा साधला आहे. central Agri laws repealed

हे देखील पहा-

ते आज म्हणाले, आज खऱ्या रूपाने देशाची मन की बात समोर आली आहे. 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे पण शेवटी सरकारला माघार घ्यावीच लागली. हे सर्व 1 वर्ष आधी ऐकलं असत तर ही वेळ आली नसती, 450 शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते. पण तेव्हा राजकारण होत, आम्हीपण सर्वांना विनवणी केली होती पण विपक्षच त्यांनी ऐकलं नव्हतं. असो, मी या निर्णयच स्वागत करतो. पंजाबच्या निवडणुकीत हार होईल म्हणूनच म्हणून कायदे मागे घेतले आहेत. केंद्र सरकारला जगभरातून दबाव होता, शेवटी शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. राऊतांनी जय जवान जय किसान अशी घोषणा देखील यावेळी दिली.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारला अभिनंदन केलं. पुढे ते म्हणले, शेतकरांवर अत्याचार, आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला त्यानंतरही शेतकरी ठाम राहिले. काळे कायदे सरकारने वापस घेतले. गेल्या दीड वर्षांपासून ३ काळ्या कायद्याविरुद्ध पंजाबचे शेतकरी आंदोलन करत होते. सरकारची भूमिका त्यावेळी आडमुठेपची होती, झुकणार नाही अशी हाती. शेकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारलं, आतंकवादी, खलिस्तानी, अश्या प्रकारच्या उपाध्या त्यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आल्या होत्या पण, शेतकऱ्यांनी भूमिका स्पष्ट होती. पंजाब आणि UP निवडणुक आहेत आणि शेतकरी आपल्यावर संतप्त आहे म्हणून यांनी उशिरा का होईना ऐकलं असा टोला यावेळी राऊतांनी लगावला आहे.

"...म्हणून 3 काळे कायदे सरकारने वापस घेतले"-  संजय राऊत
'आधी संसदेत कायदे मागे घ्या आणि मगच...; राकेश टिकैत

१३ राज्यातल्या पोट निवडणुकीत BJP दारुण पराभव झाला. पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बळी जाताना सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत राहील, पण संपूर्ण देश त्यांच्या विरोधात आहे हे मोदींना कळून चुकल. तीन काळे कायदे रद्द करण्याचा निर्णय निवडणुकीत फटका बसेल या भीतीनं घेतला असावा, असं राऊत यांनी यावेळी भाष्य करताना म्हटलं आहे. तर ED, CBI ,IT ची मनमानी वाढली आहे, त्यांना चाप बसायला हवा असेही राऊत यावेळी म्हणाले,

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com