संजय राऊत म्हणतात; ...पण अजून इंटरवल झालेलाच नाहीये!

कॉर्डिलीया क्रूझ प्रकरणाला दिवसेंदिवस नवे वळण मिळत चालले आहे. हे प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे.
संजय राऊत म्हणतात; ...पण अजून इंटरवल झालेलाच नाहीये!
संजय राऊत म्हणतात; ...पण अजून इंटरवल झालेलाच नाहीये!Saam Tv News

वैदेही काणेकर

मुंबई : कॉर्डिलीया क्रूझ प्रकरणाला दिवसेंदिवस नवे वळण मिळत चालले आहे. हे प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे. आधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तर काल रविवारी या प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईलने एक मोठा गौप्यस्फोट केला.

त्याचा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. याबाबत संजय राऊत यांनी आज सकाळी प्रतिक्रिया देताना पिक्चर अभी बाकी है अशी प्रतिक्रिया दिली होती.

हे देखील पहा-

आता राऊत म्हणाले, मी असं म्हणालो, इंटरवलच्या नंतर ... पण अजून इंटरवल झालेला नाहीये. संघर्ष हा नवाब मलिक विरुद्ध एक अधिकारी असा नाहीयेत. नवाब मलिक हे केबिनेट मंत्री आहेत आणि कॅबिनेट मंत्री बोलतो तेव्हा तो व्यक्ती नसतो तर ते सरकार म्हणतं. मला वाटत नाही हा संघर्ष टोकाला गेला आहे.

या गोष्टी कायद्याने व्हायला पाहिजेत आणि कुठलीही केंद्रीय तपास यंत्रणा त्यात गैरवापर करून महाराष्ट्रात काही बेकायदेशीर कृत्य घडत असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असे मला स्पष्टपणे वाटतं. मुख्यमंत्री असेल राज्याचे गृहमंत्री असतील त्या प्रत्येकाला असं वाटतं राज्यात कोणतीही बेकायदेशीर कारवाई होऊ नये.

संजय राऊत म्हणतात; ...पण अजून इंटरवल झालेलाच नाहीये!
Nashik : घरच्या घरी उपचार करणं बेतलं जीवावर; 14 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू (पहा व्हिडीओ)

ज्या प्रकारचे पुरावे समोर आले... पुरावे समोर आले आहेत... सत्य समोर आले.. त्याची चौकशी राज्य सरकारने देखील स्वतंत्रपणे करायला हवी आणि ती चौकशी होईपर्यंत संबंधित अधिकारी त्या पदावर राहता कामा नये. विरोधकांना काहीही बोलू द्या, आम्ही गांभीर्याने घेत नाही.ही राजकीय पक्षाची लढाई नाही. एक कारवाई झाली आहे त्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणारे काही पुरावे समोर आले आहेत. त्यात राजकीय काही नाही. केंद्रीय यंत्रणा या महाविकास आघाडीचे नेते , मंत्री यांना भरकटवत फरफटवत घेऊन जातात बदनाम करतात ते त्यांना मान्य आहे का?

ही यंत्रणा आहे त्याचे तुम्ही मालक नाही आहात .. या सरकारी यंत्रणा आहेत.... त्यांचे मालक असल्यासारखे वागू नका आणि बोलू नका .... तुम्हाला वाटत असेल... तर 2024 ला मालक बदलतील...

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com