Sanjay Raut: गोव्यात खिचडी बनली तर त्यात शिवसेना किंवा राष्ट्रवादी असणारच - संजय राऊत

गोव्यात जर खिचडी बनत असेल तर त्यात कडीपत्ता, हळद अशापैकी काही न काही आम्ही किंवा राष्ट्रवादी नक्की असणार.
Sanjay Raut
Sanjay RautSaam TV

मुंबई : गोव्यात जर खिचडी बनत असेल तर त्यात कडीपत्ता, हळद अशापैकी काही न काही आम्ही किंवा राष्ट्रवादी नक्की असणार. आम्ही जास्त सीट्स लढवत नाही आहोत, आम्हाला माहीत आहे आमची मर्यादा काय आहे. आम्हाला माहित आहे आम्हाला काय करायचे आहे. मला वाटते तिथे काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी लढाई होईल. तृणमूल तिकडे 40 सीट्स लढत आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहेरा देऊ शकतात. (Sanjay Raut on Goa Assembly Election 2022)

Sanjay Raut
Sanjay Raut: पर्रीकरांच्या मतदारसंघातून भाजपकडून माफियाला तिकीट, उत्पल पर्रीकरांचं तिकीट का थांबवलं - संजय राऊत

आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) गोव्यात आहेत. माझे आताच मुख्यमंत्री, आणि आदित्य ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे, मी देखील गोव्याला निघालो आहे. दुपारी आम्ही एकत्र बसून दुपारी पत्रकार परिषद घेऊ, त्यात आम्ही जाहीर करू, कोण कुठे किती जागा लढवत आहे, अशी माहिती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.

गोव्यात आघाडीसाठी प्रयत्न केले, पण स्थानिक काँग्रेस नेत्यांना ती पेलली नाही - संजय राऊत

गोव्यात देखील काँग्रेससोबत आघाडी व्हावी यासाठी आम्ही दोन्ही पक्षांनी प्रयत्न केले पण स्थानिक काँग्रेस नेत्यांना ती आघाडी पेलली नाही. म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि एकत्र लढतोय.

Sanjay Raut
Sanjay Raut On UP Election: ...तर गंगा नदीतले मृतदेह योगींना मतदान करणार आहेत का?

संजय राऊतांचं ट्विट

ट्विट वरून तुम्ही अर्थ काढू नका, मी सध्या राजकारणात पाहतोय. नीतिमत्ता मूल्य काही उरली नाहीत. व्यक्तिगत जीवनात राहिली नाहीत. त्यामुळे मला समाजापुढे काही धोके दिसत आहेत म्हणून मी ते म्हटले आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com